महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: मतदान दिवशी Photo Voter Slips नव्हे तर PAN Card, Aadhaar Card सह ही '11' ओळखापत्र ग्राह्य ठरणार!
तसेच मतदान केंद्रात नव्याने नोंदणी करणाऱ्या मतदाराकडे ओळखपत्र नसल्यामुळे, त्यांचा गोंधळ उडून जातो. यासाठी सरकारकडून आता नवीन उपाययोजना सुरु करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस राहिले असून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जातात. तसेच मतदान हे नागरिकांचा केवळ हक्क नसून कर्तव्यही आहे, असे सरकारकडून वारंवार आवाहन केले जाते. मात्र, निवडणुकी दरम्यान अनेकांचे मतदान ओळखपत्र नसल्यामुळे त्यांना मतदान करता येत नाही. मतदार ओळखपत्र गहाळ झाल्यामुळे किंवा चोरीला गेल्यामुळे अनेक लोकांना मतदान करताना अडचणी निर्माण होतात. तसेच मतदान केंद्रात नव्याने नोंदणी करणाऱ्या मतदाराकडे ओळखपत्र नसल्यामुळे, त्यांचाही गोंधळ उडून जातो. यासाठी सरकारकडून आता नवीन उपाययोजना सुरु करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आता मतदान करताना तुमच्याजवळ केवळ मतदान ओळखपत्र असणे गरजेचे नाही. याशिवाय इतर सरकारी कागदपत्रांचाही मतदान करताना वापर करु शकता, अशी माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे, मतदान केंद्रावर येण्यापूर्वी तुमचे नाव मतदान यादीत आहे का? हे पाहणे अतिशय महत्वाचे आहे. ज्या मतदाराचे नाव मतदार यादीत आहे, अशाच मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश मिळणार आहे. मतदान केंद्रावर मतदान पावती ओळखपत्रासोबत खाली दिलेल्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र असणे गरजेचे आहे.
मतदाराजवळ आवश्यक असणारी कागदपत्रे-
1) पासपोर्ट
2) वाहन चालक परवाना
3) छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र)
4) छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक
5) पॅनकार्ड
6) एनपीआर अंतर्गत आरजीआयकडून मिळालेले स्मार्ट कार्ड
7) मनरेगा कार्यक्रमपत्रिका
8) कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
9) छायाचित्र असेलेल निवृत्तीवेतन दस्तावेज
10) खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र
11) आधार कार्ड
मतदाराला यासंदर्भात अधिक माहिती मिळवायची असल्यास निवडणूक आयोगच्या अधिकृत वेबसाईला भेट द्यावे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येत्या २१ ऑक्टोबर रोजी पार पडणार असून २४ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.