Maharashtra Assembly Election 2019: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते, मंत्री, पदाधिकाऱ्यांची 'मातोश्री'वर बैठक; युतीच्या जागावाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता

त्यामुळे शिवसेनेने या बैठकीआधीच आपली बैठक बोलावली आहे. सत्तेतील वाटा आणि जगावाटप या दोन मुद्द्यांवरुन या दोन्ही पक्षातन नेहमीच रस्सीखेच पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकीनंतरही भाजपने जागावाटपाचा मुद्दा छेडला होता.

Uddhav Thackeray | (Photo Credit: Facebook)

Maharashtra Assembly Election 2019: शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान 'मातोश्री' (Matoshree) येथे आज पक्षाची महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु असलेल्या या बैठकीस शिवसेनेचे राज्यातील अनेके महत्त्वाचे नेते आणि मंत्री उपस्थित आहेत. विधानसभा निवडणूक 2019 ही निवडणूक शिवसेना-भाजप (BJP) हे लोकसभा निवडणूक 2019 प्रमाणे युती करुनच लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा कसा सोडवावा. तसेच, शिवसेनेने किती आणि कोणत्या जागा लढवाव्यात यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पक्षाची बैठक आज सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे. त्यामुळे शिवसेनेने या बैठकीआधीच आपली बैठक बोलावली आहे. सत्तेतील वाटा आणि जगावाटप या दोन मुद्द्यांवरुन या दोन्ही पक्षातन नेहमीच रस्सीखेच पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकीनंतरही भाजपने जागावाटपाचा मुद्दा छेडला होता. विधानसभेच्या 288 जागांपैकी शिवसेना आणि भाजप हे प्रत्येकी 135 जागा लढवतील आणि उर्वरीत जागा मित्रपक्षांना सोडतील असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्याला शिवसेनेकडून कोणताही दुजोरा मिळाला नाहीच. याशिवाय लोकसभा निवडणुकीवेळी जागावाटपाची बोलणी करताना 50-50 फॉर्म्युला ठरला असल्याचे शिवसेनेने ठणकाऊन सांगितले.

दरम्यान, शिवसेनेची प्रतिक्रिया आणि मित्रपक्षांचा सूर विचारात घेऊन राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीकडे धाव घेतली. त्यानंतर हे नेते महाराष्ट्रात परतले असून आज सायंकाळी पाच वाजता पक्षाची बैठक घेणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या बैठकीत काय ठरते. याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, लोकसभेच्या उपाध्यक्षपदी भावना गवळी यांची वर्णी लागणार? शिवसेना पक्षाची भाजपकडे मागणी)

दरम्यान, या बैठकीत जागावाटपाची बोलणी झाली तरी, ती अंतिम असण्याची मुळीच शक्यता नाही. ही बोलणी प्राथमिक स्तरावरची असणार आहेत. दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीतच जागावाटपाचा तिढा सुटणार आहे. त्यामुळे सध्या तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वेट अॅण्ड वॉच अशीच भूमिका आहे.