Maharashtra: ब्रिटेन येथून आलेल्या 8 जणांना COVID19 च्या नव्या रुपातील स्ट्रेनची लागण, संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात असल्याची राजेश टोपे यांची माहिती
त्यामुळे विविध देशांनी आपली विमान सेवेवर बंदी घातली आहे.
Maharashtra: कोरोना व्हायरसचे थैमान अद्याप कायम आहेच परंतु ब्रिटेन, युके सारख्या देशात कोरोनाचे नव्या रुपातील स्ट्रेन (Strain) विषाणू आढळल्याने हाहाकार माजला आहे. त्यामुळे विविध देशांनी आपली विमान सेवेवर बंदी घातली आहे. तर परदेशातून देशात आलेल्या नागरिकांसाठी सुद्धा काही नियम लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान आता ब्रिटेन येथून आलेल्या काही जणांना कोविड19 च्या नव्या रुपातील स्ट्रेनची लागण झाली आहे. तसेच या लोकांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी असे म्हटले आहे की, एकूण 8 जणांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. त्यापैकी 5 जण हे मुंबई आणि प्रत्येकी एक जण हा पुणे, ठाणे आणि मिरा भायंदर येथील असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात असल्याचे ही टोपे यांनी म्हटले आहे.(Mumbai COVID-19 Death Cases: मुंबईत कोरोना रुग्णांचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमी मृत्यूदर पाहून BMC आयुक्तांनी कोविड योद्धांसह जनतेचे केले अभिनंदन)
Tweet:
तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात बैठक बोलावली होती. याचवेळी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची 8 जणांना लागण झाल्याच्या स्थिती संदर्भात चर्चा झाली.(COVID-19 Vaccine Dry Run: राज्यासह देशभरात आजपासून कोविड-19 लसीची ड्राय रन)
Tweet:
दरम्यान, भारतामध्ये लसीकरणाची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने होणार आहे. त्याचि माहिती वेळोवेळी सरकारी यंत्रणेद्वारा दिली जाणार आहे. हे लसीकरण कुणावरही बंधनकारक नसेल असे काही दिवसांपूर्वी आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुमची लस घेण्याचि इच्छा असेल तर ती सुरक्षितपणे घेण्यासाठी तुम्हांला को विन अॅप वर रजिस्ट्रेशन करणं गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणांकडून दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत को विन वर 75 लाख नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले आहे.