Maharashtra: गडचिरोली येथे पोलिसांकडून 13 नक्षलवाद्यांचा खात्मा
या चकमकी दरम्यान पोलिसांनी 13 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
Maharashtra: महाराष्ट्रातील गडचिरोली (Gadchiroli) येथे आज (21 मे) पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकी दरम्यान पोलिसांनी 13 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. ही चकमक गडचिरोलीतील एटापल्लीच्या जंगलात पोलिसांच्या सी-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये झाली. मात्र अद्याप नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही. या परिसरात पोलिसांकडून अद्याप तपास केला जात आहे.
असे सांगितले जात आहे की, पोलीसांची टीमला परिसरातील नक्षलवाद्यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या सी-60 कमांडो टीमकडून तपास सुरु झाला. या दरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या टीमवर हल्ला केल्यानंतर चकमक सुरु झाली. यामध्ये 13 नक्षलवादी मारले गेले आहेत. या घटनेची पुष्टी गडचिरोलीचे डीआयजी संदीप पाटील यांनी केली आहे.(गडचिरोली: नक्षलवाद्यांसोबत चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने व सी60 शिपाई किशोर आत्राम शहीद; अन्य तीन पोलिस जखमी)
Tweet:
Tweet:
यापूर्वी 29 मार्चला गडचिरोलीतील खोब्रामेन्धा येथील घनदाट जंगलात सुरक्षा दलासोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली. त्यावेळी दोन महिलांसह पाच नक्षलवादी मारले गेले. पहिला एनकाउंटर अशा वेळी झाला जेव्हा गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडो टीमकडू शनिवारी तपास करण्यास सुरुवात केली. विविध ठिकाणी लपलेल्या जवळजवळ 50-60 नक्षलवाद्यांसोबत जोरदार गोळीबार झाला. दोन्ही बाजूने जवळजवळ 1 तासांहून अधिक वेळ गोळीबार सुरु होता. त्यानंतर नक्षलवादी पाठी हटले आणि सकाळच्या वेळी जंगलात पळून गेले.
त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात तपास केला आणि तेथून 3 प्रेशर कूकर बॉम्ब, 303 रायफल मॅगजीन, जीवंत काडतूसे, विजेच्या तारा, फायर-क्रॅकर बॉम्ब, औषध आणि अन्य गोष्टी हस्तगत केल्या. दुसऱ्या चकमकीवेळी जेव्हा फायरिंगमध्ये सी-60 कमांडो कडून पाच नक्षल वाद्यांना मारण्यात आले त्यामध्ये दोन महिलांचा सुद्धा समावेश होता.