Maharashtra: अहमदनगर येथे कोविडच्या रुग्णाकडे दुर्लक्ष, व्यक्तीचा महापालिका रुग्णालयातील स्ट्रेचरवर मृत्यू
त्यामुळे रुग्णालयात रुग्णांना उपचार घेणे सुद्धा मुश्किल होऊ लागले आहे. अशातच ऑक्सिजनचा निर्माण झालेला अपुरा साठा, आरोग्य व्यवस्थेवर असलेला ताण आणि औषधांचा तुटवडा या सर्व एकूणच गोष्टी पाहता रुग्णाला योग्य उपचार मिळणे सध्याच्या स्थितीत ढासळत चालले आहे.
Maharashtra: राज्यात कोरोना ग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांना उपचार घेणे सुद्धा मुश्किल होऊ लागले आहे. अशातच ऑक्सिजनचा निर्माण झालेला अपुरा साठा, आरोग्य व्यवस्थेवर असलेला ताण आणि औषधांचा तुटवडा या सर्व एकूणच गोष्टी पाहता रुग्णाला योग्य उपचार मिळणे सध्याच्या स्थितीत ढासळत चालले आहे. अशात काही ठिकाणची कोरोनाची अशी प्रकरणी समोर आली आहेत ती ऐकताच दृदय पिळवटून येते. याच पार्श्वभुमीवर अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महापालिका रुग्णालयात कोविडच्या रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा स्ट्रेचरवर मृत्यू झाला आहे.
अहमदनगर येथे रुग्णालयात रुग्णांसाठी बेड्स, मेडिकल स्टाफ आणि ऑक्सिजन पुरवठ्याचा तुटवडा भासत आहे. अशातच महापालिका रुग्णालयात खुप रुग्णांची संख्या असल्याने या कोविडच्या रुग्णाला योग्य उपचार मिळण्यापासून दूरावला गेला.तर व्यक्तीचा स्ट्रेचवरच मृत्यू होण्यापूर्वी त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही त्यामुळे ही घटना घडली आहे.(Maharashtra: अंबरनाथ मधील निवृत्ती व्यक्तीकडून संपूर्ण पेन्शची रक्कम व्हेंटिलेटर्ससाठी दान)
दरम्यान, राज्य सरकारने राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवला आहे. यासंदर्भात आदेश काढला आहे. त्यानुसार, राज्यात आत्ता लागू असलेले निर्बंध 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत. देशात पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट देखील येण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच महाराष्ट्रात जुलै, ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, अशी भिती राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.(मुंबईतील BKC जम्बो कोविड सेंटर बंद असल्याने लस घेण्यासाठी आलेल्यांना पोलिसांकडून पाठवले जातेय घरी, पुढील 3 दिवस लसीकरण बंद राहणार)
तर महाराष्ट्रात 66 हजार 159 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 68 हजार 537 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 37 लाख 99 हजार 266 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 70 हजार 301 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.69% झाले आहे,