Mahaparinirvan Diwas 2022 Mumbai Local Train, BEST Update: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मुंबईत बस, रेल्वे कडून विशेष सोय; पहा खास सोयी-सुविधा

बेस्ट बस, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आपापल्या मार्गांवर विशेष बस, रेल्वे चालवणार आहेत.

Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस (Mahaparinirvan Diwas) म्हणून भीम अनुयायी पाळतात. देशा-परदेशातून या दिवशी दादरच्या चैत्यभूमीवर भीम अनुयायी बाबासाहेबांच्या स्मृतींना वंदन करायला येतात. यंदाही भीम अनुयायींची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बेस्ट प्रशासन, रेल्वे प्रशासन यासाठी विशेष सेवा देखील चालवणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी ट्रेन आणि बसची विशेष सोय असणार आहे. बेस्ट बस, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आपापल्या मार्गांवर विशेष बस, रेल्वे चालवणार आहेत.

मध्य रेल्वे द्वारे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 अनारक्षित विशेष गाड्यांची देखील घोषणा करण्यात आली आहे. नागपूर, कलबुर्गी, अजनी, सोलापूर येथून मुंबई मध्ये येण्यासाठी विशेष ट्रेन्स धावणार आहेत. मुंबई लोकल च्या देखील 12 विशेष लोकल गाड्या मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गांवर धावणार आहेत. चैत्यभूमीवर विशेष सोय देखील असणार आहे. नक्की वाचा: Mumbai Traffic Update: महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभुमिवर मुंबईतील वाहतुकी संबंधी विशेष सुचना जारी, जाणून घ्या पर्यायी मार्ग.

बेस्ट बस सेवा

दादर चौपाटी जवळ असणार्‍या चैत्यभूमीवर पोहचण्यासाठी दादर रेल्वे स्थानक ते शिवाजी पार्क आणि पुन्हा दादर रेल्वे स्थानक अशी बससेवा चालवली जाणार आहे. त्यासाठी सकाळी 7.30 ते रात्री 9.30 दरम्यान विशेष बस धावतील. 5 ते 7 डिसेंबर दरम्यान दादर ते ठाणे किंवा नवी मुंबईत प्रवास करणार्‍यांना बेस्ट कडून 50 रूपयांचा एसी बसचा डेली पास उपलब्ध करून देण्यात आला आहे.