Mahaparinirvan Din 2023 Local Holiday: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत 6 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे.

Dr. Babasaheb Ambedka | (Photo Credits: Wikipedia Commons)

Mahaparinirvan Din 2023 Local Holiday: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुण्यतिथीनिमित्त 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्टी (Local Holiday) जाहीर केली आहे. मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटी (MRCC) च्या अध्यक्षा आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून 6 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची विनंती केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, बुधवारी बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीनिमित्त मुंबई आणि उपजिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी आणि प्रशासकीय कार्यालये बंद राहणार आहेत.

गायकवाड यांनी पत्रात लिहिले होते, ‘आंबेडकरांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य जातिवाद निर्मूलनासाठी आणि गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त चैत्यभूमीवर केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर परदेशातूनही मोठा जनसमुदाय येतो. मात्र, हा दिवस कामाचा दिवस असल्याने अनेक अनुयायी शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतीस्थळी आदरांजली वाहण्यास असमर्थ आहेत. अनेक राज्य संघटना अनेक वर्षांपासून या दिवशी सुट्टीची मागणी करत आहेत. जर या दिवशी सुट्टी जाहीर केली तर, त्यामुळे आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायाला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त चैत्यभूमीला भेट देण्याची संधी मिळेल.’

सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी ‘अनंत चतुर्दशी’ या दिवशी आणि सन 2007 पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता सन 2023 मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर, 2023 रोजी तिसरी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. (हेही वाचा: Mahaparinirvan Din 2023: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येणाऱ्या अनुयायांसाठी अनेक सुविधा; विशेष रेल्वे सेवा, तात्पुरता निवारा, शामियाना, भोजनाची सोय, जाणून घ्या सविस्तर)

हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून परिसरातील महानगरपालिकेच्या सहा शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif