Mahaparinirvan Din 2019 Mumbai Traffic Diversion: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त शिवाजी पार्क परिसरात वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल; जाणून घ्या कोणते मार्ग राहणार बंद
मुंबईत उसळणारा भीमअनुयायींचा जनसागर पाहता वाहतूक आणि रहदारीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. दादर, प्रभादेवी येथील काही रस्ते बंद ठेवत पर्यायी वाहतूक रस्ते सुरू ठेवले जाणार आहेत.
Dr. Babasaheb Ambedkar 63rd Death Anniversary: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल होतात. दादर येथील शिवाजी पार्क(Shivaji Park) नजिक चैत्यभूमीवर (Chaitya Bhoomi) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. दरम्यान मुंबईत उसळणारा भीमअनुयायींचा जनसागर पाहता वाहतूक आणि रहदारीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. दादर, प्रभादेवी येथील काही रस्ते बंद ठेवत पर्यायी वाहतूक रस्ते सुरू ठेवले जाणार आहेत. तर काही ठिकाणी एकाच मार्गाने वाहतूक चालू राहील. मग 5 ते 7 डिसेंबर दरम्यान दादर परिसरात हे बदल नेमके कसे, कुठे केले आहेत याची माहिती मुंबई पोलिसांकडून खास ट्वीटच्या दिली आहे. Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे '5' प्रेरणादायी विचार बदलतील तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन!
मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्विटनुसार, एस. के बोले रोड, रानडे रोड, ज्ञानेश्वर मंदिर रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग बंद राहणार आहेत तर सेनापती बापट मार्ग येथून जडा वाहनं, बेस्ट बसेस, माल वाहतूक वाहनं वगळता इतर वाहनांना वळवण्यात येणार आहे.
मुंबई पोलिस ट्वीट
दादर परिसरात शिवाजी पार्ककडे जाणार्या रस्त्यांवर टिळक ब्रीज पासून रानडे रोड, भवानी शंकर रोड सह आठ ठिकाणी नो पार्किंग झोन आहे. तर वाहनं पार्क करण्यासाठी इंडिया बुल्स, फाईव्ह ग्राऊंड सह कोहिनूर स्केवर सह 10 नजीकच्या ठिकाणी पार्किंगसाठी सोय करून देण्यात आली आहे. दरम्यान अत्यावश्यक वाहनांना माहीमकडे जाण्यासाठी सिद्धीविनायक जंक्शन ते कापड बाजार जंक्शन पर्यंत दक्षिण वाहिनीवर राखीव लेन ठेवण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांसोबतच मुंबई महानगर पालिका प्रशासन आणि अनेक व्हॉलेंटिअरकडून भीम अनुयायींसाठी मदत कक्ष उभारले जाणार आहेत. यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जाणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)