Mahaparinirvan Din 2019: महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभुमीकडे जाण्यासाठी 7 डिसेंबर पर्यंत अतिरिक्त BEST बस सेवा, जाणून घ्या वेळापत्रक
बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील दादर येथे असलेल्या चैत्यभुमीवर हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी उपस्थिती लावतात.
Dr. Babasaheb Ambedkar 63rd Death Anniversary: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील दादर येथे असलेल्या चैत्यभुमीवर हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी उपस्थिती लावतात. मात्र या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यासाठी वाहतूक मार्गात सुद्धा बदल करण्यासोबत 7 डिसेंबर पर्यंत अतिरिक्त बेस्ट सेवा सुरु करण्यात आली आहे.
चैत्यभुमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे 5,6 आणि 7 डिसेंबर या दिवशी अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर बस क्रमांक 241 वडाळा डेपो ते मालवणी डेपो, 351 बस क्रमांक मुंबई सेन्ट्रल डेपो चे टाटा पावर स्टेशन आणि 354 कन्नामवर नगर ते आर. जी. गडकरी चौक पर्यंत रात्रकालीन बससेवा गुरुवारी सुरु राहणार आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्विटनुसार, एस. के बोले रोड, रानडे रोड, ज्ञानेश्वर मंदिर रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग बंद राहणार आहेत तर सेनापती बापट मार्ग येथून जडा वाहनं, बेस्ट बसेस, माल वाहतूक वाहनं वगळता इतर वाहनांना वळवण्यात येणार आहे. त्याचसोबत मध्य रेल्वेकडून सुद्धा विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.(Mahaparinirvan Din 2019 Mumbai Traffic Diversion: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त शिवाजी पार्क परिसरात वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल; जाणून घ्या कोणते मार्ग राहणार बंद)
BEST Tweet:
यंदा बाबासाहेब आंबेडकरांची 63 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवसाचं औचित्य साधत अनेक भीम अनुयायी दादर येथे पांढर्या वेशभूषेत, निळा झेंडा घेऊन दाखल होतात. यंदा देखील लाखो भीम अनुयायी दाखल होण्याची शक्यता आहे.