शरद पवार यांच्या विरोधात कमळ चिन्हावर माढा येथून लोकसभा मैदान मारण्याची महादेव जानकर यांची इच्छा

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्याला तिकिट दिले तर, आपण शरद पवार यांच्या विरोधात माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढू असे जानकर यांनी म्हटले आहे.

Mahadev Jankar will fight against Sharad Pawar from Madha Lok Sabha constituency | (Photo credit: archived, edited, representative image)

पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स विकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व्हेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी माढा लोकसभा मतदार संघातून (Madha Lok Sabha Constituency) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे स्पष्ट होताच जानकर यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्याला तिकिट दिले तर, आपण शरद पवार यांच्या विरोधात माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढू असे जानकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र केसरी नव्हे तर हिंद केसरी व्हायचे आहे

माढा मतदारसंघातून शरत पवार यांना टक्कर द्यायची असेल तर, भाजपने आपल्याला तिकीट द्यावे. पवार यांची स्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. आता त्यांचा प्रभाव बराच कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना टक्कर द्यायची तर आपण भाजपच्या तिकीटावर लढायला तयार आहोत असे सांगतानाच आपल्याला आता महाराष्ट्र केसरी नव्हे तर हिंद केसरी व्हायचे आहे, असे सांगत आपल्याला दिल्लीच्या राजकारणात रस असल्याचेही जानकर यांनी सूचवले आहे. (हेही वाचा-Dhangar Reservation: धनगर समाज जल्लोष केव्हा करणार? प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणतात 'तारीख सांगणार नाही')

रासपाला हव्यात 6 जागा

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षासाठी आपण एनडीएकडे 6 जागा मागितल्याचेही जानकर यांनी या वेळी सांगितले. लोकसभेसाठी जागा वाटप सुरु आहे. या जागावाटपात राष्ट्रीय समाज पक्षासाठी आपण . बारामती, माढा, परभणी, बीड, ईशान्य मुंबई आणि अमरावती हे मतदासंघ आपण एनडीएकडे मागीतले असल्याचे जानकर यांनी म्हटले.