Coronavirus वर मुंबई पोलिसांनी शेअर केले अनोखं ट्विट; 'नुक्कड', 'महाभारत'सह जुन्या शोचं शीर्षक वापरुन दिला घरी बसण्याचा सल्ला
या ट्विटसाठी, मुंबई पोलिसांनी दूरदर्शनवर सध्या सुरु दाखवल्या जाणार्या महाभारत, हम लोग आणि श्रीमन श्रीमतीपासून फौजी आणि सर्कसपर्यंत, सर्व प्रसिद्ध टीव्ही शोजच्या शीर्षकाचा वापरुन लोकांना जाणीव करून देण्यासाठी दोन वाक्ये तयार केली.
कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus) भारत लढा देत असताना, देशभरातील पोलिस जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने नागरिकांना घरी बसून सुरक्षित राहण्याचे आव्हान करत आहे. यात मुंबई पोलिसांचाही (Mumbai Police) समावेश आहे. त्यांचे ट्विटर अकाउंट व्हायरसबद्दल महत्त्वपूर्ण संदेश देणाऱ्या विनोदी पोस्ट्स भरले आहेत. गुरुवारी मुंबई पोलिसांनी आणखी एक क्रिएटिव्ह पोस्ट शेअर करुन नागरिकांना घराबाहेर पडण्यास टाळायला सांगितले. या ट्विटसाठी, मुंबई पोलिसांनी दूरदर्शनवर सध्या सुरु दाखवल्या जाणार्या जुन्या टेलिव्हिजन शोची शीर्षके वापरली. 'महाभारत', 'हम लोग' आणि 'श्रीमन श्रीमती'पासून 'फौजी' आणि 'सर्कस'पर्यंत, मुंबई पोलिसांनी या सर्व प्रसिद्ध टीव्ही शोजच्या शीर्षकाचा वापरुन लोकांना जाणीव करून देण्यासाठी दोन वाक्ये तयार केली. आणि ते ट्विट पाहून तुम्हाला पुन्हा एकदा या सर्व जुन्या शोची आठवण नक्की येईल. (Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्र राज्यात आज 165 नव्या रुग्णांची नोंद; राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3000 च्या पार)
"देख भाई देख, बाहेर महाभारत चालली आहे. आपण 'नुक्कड' वर नाही जायचं. जे 'मुंगेरीलालचे स्वप्न' आहेत, त्यांचा 'फ्लॉप शो' नाही बनवणार," मुंबई पोलिसांनी सामायिक केलेल्या पहिल्या फोटोवर म्हटले. "श्रीमान श्रीमती, आपणही करमचंद किंवा ब्योमकेश नका बानू. कोरोनाविरुद्ध 'फौजी' बाहेर लढा देत आहेत, बाहेर जाऊन 'सर्कस' नका करू," दुसऱ्या फोटोत म्हटले. "एक संदेश आपल्यासमोर बऱ्याच वर्षांपासून होता, अगदी जवळच्या 'नुक्कड' वर असल्यासारखा, असे मुंबई पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
या ट्विटवरून नेटिझन्सना खूप प्रभावित झाले आणि टिप्पण्या विभागात ते व्यक्तही केले. एका यूजरने लिहिले, "नेहमीप्रमाणेच सुंदर क्रिएटिव्हिटी." “आणि ऐका, 'शक्तिमान' नाही येणार वाचवायला,” असे दुसर्या यूजरने लिहिले.
उत्कृष्ट
तुमच्या टीमला सलाम
स्पष्ट करण्याचा उत्तम मार्ग
देशव्यापी लॉकडाउनमध्ये अनेक जुन्या टेलिव्हिजन कार्यक्रमांनी दूरदर्शनवर पुनरागमन केले. यापैकी काहींमध्ये रामानंद सागरचे रामायण, बीआर चोप्राचे महाभारत, शक्तीमान, श्रीमान श्रीमती, व्योमकेश बक्षी आणि बऱ्याच जुन्या प्रसिद्ध शोजचा समावेश आहे. डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहानमध्ये पहिल्यांदा नोंदविलेल्या कोरोना व्हायरसने आता जगभरातील 2 लाख पेक्षा अधिक लोकांना संसर्गित केले आहे. भारतात आतापर्यंत कोविड-19 च्या 12,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.