IPL Auction 2025 Live

'महाविकास आघाडीच्या सरकारला स्थगिती लागणार असून लवकरच महाराष्ट्रात भाजप सत्तेवर येणार'- सुधीर मुनगंटीवार

यांच्या भेटीनंतर पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळेल का अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Sudhir Mungantiwar | (Photo Credits-Facebook)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे रविवारी सोलापूर येथील अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्या परिवारातील लग्नाच्या निमित्ताने एकत्र आले होते. यांच्या भेटीनंतर पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळणार का? अशी भिती व्यक्त केली जात आहे. यातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ निर्माण केली आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा अर्थ म्हणजे या महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) कोणत्याही क्षणी स्थगिती दिली जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला गोड बातमीसाठी जास्त काळ थांबावे लागणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु काही तासातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपचे सरकार पाडले होते. यानंतर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी तिन्ही पक्षाने एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून या सरकारला स्थगिती लागून लवकरच महाराष्ट्रात भाजप सरकार स्थापन करणार, असे भाष्य सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भेटीवर केले आहे. हे देखील वाचा-दिल्ली येथील निर्भया बलात्कार प्रकरणी आण्णा हजारे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला स्थगिती शिवाय दुसरे काही अनुभवता आले नाही. यामुळे महाराष्ट्रातील जनतेने थोडे थांबा, लवकर राज्यात भाजपचे सरकार स्थापन होणार आहे, असा खळबळजनक दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.