Maha Metro Recruitment 2020: नागपूर मेट्रो मध्ये व्यवस्थापक आणि वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी भरती, कसा कराल अर्ज?

तर वरिष्ठ विभाग व्यवस्थापक पदासाठी उमेदवाराचे वय 32 वर्ष असले पाहिजे. www.mahametro.org वर तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

JOB प्रतिकात्मक फोटो (File Photo)

Maha Metro Recruitment 2020: या वर्षाच्या सरते शेवटी अनेक सरकारी जागांसाठी भरती निघत आहेत. त्यात आता महामेट्रो (Maha Metro) कडून नागपूर मेट्रो (Nagpur Metro) विभागासाठी 2 महत्त्वाच्या जागांसाठी भरती निघाली आहे. ज्यात निवडलेल्या उमेदवाराला 46,000 ते 1,80,000 रुपये महिना पगार मिळू शकतो. यात व्यवस्थापक आणि वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी भरती निघाली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ही भरती असणार आहे. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी 1-1 जागेसाठी ही भरती असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या पदासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यात उमेदवाराला मेट्रो रेल्वेचा अनुभव असणे गरजेचे आहे.

यात व्यवस्थापक पदासाठी इच्छुक उमेदवारांचे वय हे जास्तीत जास्त 45 वर्ष असणे अनिवार्य आहे. तर वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी उमेदवाराचे वय 32 वर्ष असले पाहिजे. www.mahametro.org वर तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. या दोन्ही पदांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 ही असेल.हेदेखील वाचा- Devendra Fadnavis on Shakti Act: शक्ती कायद्याचा निर्णय सरकारने घाईने घेतल्यास तो प्रभावी ठरणार नाही- देवेंद्र फडणवीस

व्यवस्थापक पदासाठी शैक्षणिक पात्रता

यात इंडस्ट्रीयल सेफ्टी आणि सेक्युरिटी मॅनेजमेंटमध्ये पदवीधर असणे गरजेचे. ( शासनमान्य विद्यापीठाकडून)

कसा कराल अर्ज

www.mahametro.org वर तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर 31 डिसेंबरला तुम्हाला मुलाखतीसाठी नागपूर मेट्रो ऑफिसात संबंधित व्यक्ती कॉलकरुन बोलावून घेतील. त्यावेळी तुमच्याकडे संबंधित कागदपत्रे आणि त्याची झेरॉक्स असणे गरजेचे आहे.

वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी शैक्षणिक पात्रता

यात B.E./B.Tech/ विद्यापीठातून शासन मान्यताप्राप्त तीन वर्षाचा सिविल डिसिप्लीन डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

कसा कराल अर्ज

www.mahametro.org वर तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर 31 डिसेंबरला तुम्हाला मुलाखतीसाठी नागपूर मेट्रो ऑफिसात संबंधित व्यक्ती कॉलकरुन बोलावून घेतील. त्यावेळी तुमच्याकडे संबंधित कागदपत्रे आणि त्याची झेरॉक्स असणे गरजेचे आहे.