MAH MBA /MMS CET 2020 Result आज 11 वाजता होणार जाहीर; cetcell.mahacet.org वर असा पहा तुमचा निकाल

Results| Photo Credits: Pixabay.com

Maharashtra MBA CET 2020: महाराष्ट्रात MAH MBA CET 2020 परीक्षेचा निकाल आज (23 मे) आज सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान 14 आणि 15 मार्च दिवशी महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल 31 मार्च दिवशी लागणं अपेक्षित होतं. मात्र कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे हा निकाल पुढे ढकलण्यात आला. मात्र आता आज दुपारी तो जाहीर होणार आहे. cetcell.mahacet.org या सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येईल.  MAH MBA /MMS CET 2020 Result: महाराष्ट्र एमबीए व एमएमएस सीईटी निकाल जाहीर; cetcell.mahacet.org वर असा पहा तुमचा स्कोअर.

MAH MBA CET या ऑनलाईन परीक्षेतील मार्कांच्या आधारे मॅनेजमेंट विषयातील अभ्यासाकरिता विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेज आणि इन्सिट्युशनमध्ये प्रवेश दिला जातो. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन सोबत अन विना अनुदानित  मॅनेजमेंट एज्युकेशन इन्स्टिट्युट मध्येही प्रवेश मिळवण्यासाठी हा स्कोर मह्त्त्वाचा आहे.

MAH MBA CET 2020 चा ऑनलाईन निकाल कसा बघाल?

दरम्यान सीईटी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी जितक्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली असतील त्यानुसार मार्कांचे गणित मांडलं जातं. हा निकाल दोन अंकी डेसिमल पॉंईंटमध्ये दिला जातो. यंदा MAH MBA CET 2020  ही परीक्षा    1 लाख 10 हजार 631 विद्यार्थ्यांनी  दिली आहे.  दरम्यान महाराष्ट्रामध्ये इतर शाखेच्या सीईटी परीक्षा लॉकडाऊनच्या काळात पुढे ढकलण्यात आल्या आहेत.