MAH MBA/MMS 2019 Results जाहीर: 164 गुणांसह दोन विद्यार्थी अव्वल स्थानी; तुमचा निकाल पहा cetell.mahacet.org या वेबसाईटवर

एकूण 102,851 विद्यार्थ्यानी सीईटी परीक्षा दिली आहे. यामध्ये पॅट्रीक डिसूझा (Patrick D'Souza), प्राप्ती शानबाग (Prapti Sanjay Shanbhag ) यांनी 164 गुणांसह टॉप केले आहे.

MAH MBA/MMS 2019 Results जाहीर: 164 गुणांसह दोन विद्यार्थी अव्वल स्थानी; तुमचा निकाल पहा cetell.mahacet.org या वेबसाईटवर
Representational Image | (Photo Credits: Unsplash.com)

परीक्षांचे सत्र संपल्यानंतर आता निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात पार पडलेल्या एमबीए सीईटीचा (MBA/MMS 2019) निकाल ऑनलाईन स्वरूपात जाहीर करण्यात आला आहे. cetcell.mahacet.org. या या वेबसाईटवर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. CET ची परीक्षा 9 आणि 10 मार्च दिवशी राज्यात पार पडली होती. दोन वर्षाच्या पूर्ण वेळ एमबीए आणि एमएमएस याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना सीईटी ही प्रवेश परीक्षा देणं अनिवार्य आहे.

तुमचा निकाल कसा पाहाल?

  • cetcell.mahacet.org साईट वर क्लिक करा.
  • 'MAH MBA CET' टॅब ओपन करा.
  • 'result' पर्यायावर क्लिक करा
  • तुमचे लॉग इन डिटेल्स द्या
  • स्क्रीन वर तुम्हांला निकाल पाहता येईल.
  • MAH MBA CET 2019 निकाल डाऊनलोड करण्याची सोय देखील दिली आहे.

टॉपर्स कोण आणि गुण किती? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकूण 102,851 विद्यार्थ्यानी सीईटी परीक्षा दिली आहे. यामध्ये पॅट्रीक डिसूझा (Patrick D'Souza), प्राप्ती शानबाग (Prapti Sanjay Shanbhag ) यांनी 164 गुणांसह टॉप केले आहे. तर त्यांच्या खालोखाल 163 गुणांसह जोस (Jose Augusto De Abreu ) हा विद्यार्थी आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2019 03:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).