MAH CET 2019 Result Date: महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल जाहीर; dtemaharashtra.gov.in वर 3 जून पर्यंत जाहीर होणार 'एमएचटी सीईटी' चा निकाल
महाराष्ट्रात यंदा 3 लाख 96 हजार विद्यार्थी एमएचटी सीईटी या परीक्षेला बसले होते. हे परीक्षार्थी पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये परीक्षेला सामोरे गेले होते.
MAH CET 2019 Result: आज (28 मे) दिवशी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता इंजिनियरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रवेशप्रकियेमधील एक एमएचटी सीईटी परीक्षा निकालांचे विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत. लवकरच एमएचटी सीईटी जाहीर होणार आहे. अंदाजानुसार हा निकाल मे महिन्याच्या अंतिम आठवड्यात ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्याता आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार 3 जूनपर्यंत हे निकाल हाती लागू शकतात. MSBSHSE 12th Std Results 2019: महाराष्ट्र बोर्ड 12 वीचा निकाल mahresult.nic.in वर घोषित; SMS आणि Online असा पहाल निकाल
विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन आयडी,पासवर्ड आणि सिक्युरिटी कोडसह एमएचटी सीईटीचा निकाल पाहता येईल. www.dtemaharashtra.gov.in वर हा निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे. यंदा 2 ते 13 मे 2019 च्या दरम्यान एमएचटी सीईटीची परीक्षा पार पडली आहे. त्यामुळे ऑनलाईन स्वरूपातच विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येईल. www.mahacet.org या वेबसाईटवर 16 मे दिवशी Answer Key जाहीर करण्यात आली होती.
महाराष्ट्रात यंदा 3 लाख 96 हजार विद्यार्थी एमएचटी सीईटी या परीक्षेला बसले होते. हे परीक्षार्थी पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये परीक्षेला सामोरे गेले होते.
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2019 04:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

