MAH BHMCT CET Result 2020 Declared: हॉटेल मॅनेजमेंट सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी काय कराल?

या प्रवेश परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना हे निकाल कुठे पाहावेत हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करुन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

Results 2020 (Photo Credits: Facebook)

जर तुम्ही हॉटेल इंडस्ट्री क्षेत्रात (Hotel Industry) करिअर करायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी त्याचे शिक्षण घेणे गरजेचे आहे आणि या क्षेत्रात पदवी शिक्षणासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते. प्रवेश परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.त MAH BHMCT CET 2020 परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले असून हे निकाल पाहण्य्साठी तुम्हाला cetcell.mahacet.org या संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल. ही परीक्षा 10 ऑक्टोबर 2020 ला घेण्यात आली होती. या परीक्षेत वेदांत काळे हा अव्वल आला असून शारवय नागावकर आणि रणवीर शिंदे हे अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आले आहेत.

या प्रवेश परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना हे निकाल कुठे पाहावेत हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करुन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.हेदेखील वाचा- MHT CET Exam 2020 Result Date Announced: इंजिनिअरिंग, लॉ, BEd च्या सीईटीचा निकाल 5 डिसेंबरला; मंत्री उदय सामंत यांची माहिती

1. सर्वात आधी cetcell.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्या.

2. त्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या तक्त्यामधील MAH BHMCT CET 2020 वर क्लिक करा.

3. त्यानंतर आलेल्या नोटिफिकेशन मधील Result पर्यायावर क्लिक करा.

4. त्यानंतर आलेली निकालाची PDF फाईल डाऊनलोड करा आणि तुमचा निकाल तुमचे नाव अथवा तुमचा परीक्षा क्रमांक पाहून तपासा.

अशा पद्धतीने तुमचा या परीक्षेत निकाल पाहू शकता. सध्या मुलांचे शिक्षण हे डॉक्टर, इंजिनियरिंग पुरता मर्यादित न राहता अनेक करियर क्षेत्र निर्माण झाली आहेत. त्यात हॉटेल इंडस्ट्रीकडे अनेक विद्यार्थ्यांचा कल असतो. या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी लेटेस्टली मराठीकडून All The Best आणि खूप सा-या शुभेच्छा!