Madhukar Pichad Supporter Join NCP: भाजप नेते मधुकर पिचड यांच्या समर्थकाची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी; जयंत पाटील यांनी शालजोडीत लगावून केले स्वागत

दरम्यान, जयंत पाटील यांनी शालजोडीत लगावून केले स्वागत गायकर यांचे स्वागत केले. जयंत पाटील म्हणाले की, ''आमचं सरकार नसतं, तर तुम्ही पक्षात आला असता की नाही, हे माहिती नाही.'' पाटील यांच्या या वक्तव्याने चांगलाच हशा पिकला.

Sitaram Gaikar Join NCP | (Photo Credit: Twitter)

ज्येष्ठ भजप नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणाऱ्या सीताराम गायकर (Sitraam Gaikar) यांनीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. गायकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या वेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान, जयंत पाटील यांनी शालजोडीत लगावून केले स्वागत गायकर यांचे स्वागत केले. जयंत पाटील म्हणाले की, ''आमचं सरकार नसतं, तर तुम्ही पक्षात आला असता की नाही, हे माहिती नाही.'' पाटील यांच्या या वक्तव्याने चांगलाच हशा पिकला.

जयंत पाटील यांनी या वेळी पक्ष सोडून गेलेल्यांचा आपल्या खुमासदार शैलीत चांगलाच समाचार घेतला. पाटील म्हणाले, आमचं सरकार नसतं तर तुम्ही आला असता की नसता हे मला माहिती नाही. पण मी याच ठिकाणी बसलो होतो. तेव्हा पक्षातून जाणारे अधिक होते. थांबायला कोणीच तयार नव्हतं. मधुकर पिचड हे तर पक्ष सोडून का गेले हे मला अद्यापही कळले नाही. असे पाटील म्हणाले.

पुढे बोलताना पाटील यांनी सांगितले की, शरद पवार यांच्याबद्धल इतर पक्षातील अनेकांना आदर आहे. त्यातील अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे, असेही पाटील यांनी सांगितले. (हेही वाचा, जळगावात भाजपला मोठा धक्का; 57 पैकी 30 नगरसेवक शिवसेनेत दाखल)

सीताराम गायकर यांच्या रुपात मधुकर पिचड यांना धक्का देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनिती आहे. गायकर हे उसतोड कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात. ते अमृत सागर दूध संघाचे संचालकही आहेत.