Aurangabad East Election Result 2024: औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात फुललं कमळ; भाजपचे अतुल सावे विजयी; इम्तियाज जलील यांचा दारुण पराभव

पहिल्या फेरीपासून ते विसाव्या फेरीपर्यंत इम्तियाज जलील आघाडीवर होते. मात्र, शेवटच्या फेरीत अतुल सावेंनी विजयश्री खेचून आणला.

Atul Save (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Aurangabad East Election Result 2024: औरंगाबाद पूर्व मतदारसंघात (Aurangabad East Constituency) भाजपच्या अतुल सावे (Atul Save) यांचा विजय झाला आहे. मतमोजणीच्या अंतिम फेरीत भाजप नेते अतुल सावे यांनी 2161 मतांनी बाजी मारून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) च्या इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचा पराभव केला. पहिल्या फेरीपासून ते विसाव्या फेरीपर्यंत इम्तियाज जलील आघाडीवर होते. मात्र, शेवटच्या फेरीत अतुल सावेंनी विजयश्री खेचून आणला. अतुल सावे औरंगाबाद पूर्व मतदारसंघात तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

दिवसभर इम्तियाज जलील यांच्या मागे राहिलेल्या अतुल सावे यांनी 21 व्या फेरीपर्यंत आघाडी घेतली. अंतिम मतमोजणीत, सावे यांनी जलील यांचा दारुण पराभव केला. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील निवडणूक अतिशय अतितटिची होती. मात्र, शेवटी भाजपला याठिकाणी आपला झेंडा फडकवण्यात यश आलं. (हेही वाचा - Kannad Vidhan Sabha Election 2024 Result: पतीवर पत्नी ठरली भारी! कन्नड मतदारसंघातून शिंदे गट शिवसेना उमेदवार संजना जाधव यांच्याकडून हर्षवर्धन जाधव यांचा दारुण पराभव)

दरम्यान, यावर्षी औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 60.63% होती, जी 2019 मधील 63.2% वरून थोडी कमी झाली आहे. या जागेसाठी 29 उमेदवार रिंगणात होते, परंतु प्राथमिक लढत सावे आणि जलील यांच्यात होती. 354,633 पात्र मतदारांपैकी 215,029 मतदारांनी मतदान केले, ज्यात 114,104 पुरुष मतदार आणि 92,921 महिला मतदारांचा समावेश आहे. (हेही वाचा - Ambegaon Assembly Election 2024 Result: शरद पवारांना धक्का! आंबेगाव मतदार संघातून दिलीप वळसे पाटील 1100 मतांनी विजयी)

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजपच्या अधिका-यांना जुन्या मराठा मतदारांचा पाठिंबा मिळेल अशी आशा होती. राजकीय विश्लेषकांनी असे सुचवले आहे की, मराठा मते भाजप, काँग्रेस, AIMIM आणि NOTA मध्ये विभागली गेली असताना, काही मराठा मतांसह दलित आणि OBC मतांनी अतुल सावे यांना विजय मिळवण्यात मदत केली.