पुणे, कोल्हापूर शहरातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर 16 ऑगस्ट पर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
आता 16 ऑगस्ट पर्यंत ही सेवा ठप्प राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वे कडून देण्यात आली असल्याने मुंबई-पुणे प्रवास करणार्या अनेकांचे हाल होणार आहेत.
Mumbai Pune Train Traffic Updates: मुंबई-पुणे दरम्यान धावणारी रेल्वे सेवा 3 ऑगस्ट पासून रखडलेली आहे. आता 16 ऑगस्ट पर्यंत ही सेवा ठप्प राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वे कडून देण्यात आली असल्याने मुंबई-पुणे प्रवास करणार्या अनेकांचे हाल होणार आहेत. मागील आठवड्याभरापासून पुण्यामधेय मुसळधार पाऊस बरसत असल्याने दरड कोसळणं, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचणं, सिग्नल यंत्रणेत बिघाड अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई - पुणे मार्गावरील रेल्वे सेवा पुढील आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई - पुणे दरम्यान नियमित धावणार्या डेक्कन क्वीन, प्रगती, सिंहगड आणि इंटरसिटी एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्या 16 ऑगस्ट पर्यंत धावणार नाहीत. तसेच कोल्हापूर, सांगली शहरातील पूरस्थिती लक्षात घेता कोल्हापूरला जाणाऱ्या कोयना एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, तसेच पुणे-भुसावळ-पुणे एक्स्प्रेस या गाड्या देखील 16 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल-नांदेड एक्स्प्रेस 10 आणि 12 ऑगस्टला पुणे स्थानकातून धावेल, तर पनवेल-नांदेड विशेष गाडी 11ऑगस्टला सोडण्यात येणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावर 8 नव्या शिवनेरी बसची सोय
Central Railway Tweet
पुण्यातील पूर स्थिती पाहता लांबपल्ल्याच्या अनेक गाड्या पुण्याऐवजी आता दौंड स्थानकातून सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याहून दौंडला जाणार्यांना आज (10 ऑगस्ट) पासून रविवारपर्यंत दोन डेमू गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या दररोज चार फेऱ्या होतील.