Lok Sabha Polls 2024: महाविकास आघाडी मध्ये 'वंचित' ची एंट्री; प्रकाश आंबेडकरांना चर्चेसाठी अधिकृत निमंत्रण

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 48 लोकसभेच्या जागेपैकी 36 चा तिढा सुटलेला आहे. आता उर्वरित 12 जागांवर बोलणी सुरू आहेत.

Uddhav Thackeray And Prakash Ambedkar | (Photo Credit - Twitter)

'इंडिया आघाडी' (India Alliance) ला पंजाब आणि पश्चिम बंगाल मध्ये धक्का बसल्यानंतर आता महाराष्ट्रात तिकीट वाटपाच्या वाटाघाटी कशा होणार? याची उत्सुकता असताना आता महाविकास आघाडीमध्ये 'वंचित' (Vanchit Bahujan Aghadi) ची एंट्री झाली आहे. आज प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना चर्चेसाठी अधिकृत निमंत्रण पाठवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 48 लोकसभेच्या जागेपैकी 36 चा तिढा सुटलेला आहे. आता उर्वरित 12 जागांवर बोलणी सुरू आहेत.

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रातील ताकद, मतदारसंघांमध्ये असलेला संपर्क पाहता महाविकास आघाडी मधील चारही पक्षांमध्ये 12-12 अशा समान जागा वाटप कराव्यात. त्यासाठी महाविकास आघाडीनं वंचित बरोबर बैठक घेऊन अंतिम निर्णय घ्यावा. असा पर्याय काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. त्यामुळे हा फॉर्म्युलाच मान्य होणार की संख्याबळानुसार ते वर खाली होणार हे आता पहावं लागणार आहे. नक्की वाचा: BJP Campaign Song For 2024 General Elections: 'तभी तो सब मोदी को चुनते हैं...' भाजपा ने फुंकलं लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचं रणशिंग! (Watch Video)  .

पहा ट्वीट

महाराष्ट्रातही ठाकरे आणि कॉंग्रेस मध्ये तिकीटवाटपावरून खडाजंगी होत असल्याचं वृत्त होते. शिवसेना ठाकरे गटाने 48 पैकी 23 जागांसाठी प्रस्ताव ठेवला होता. ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा वंचितला तर राजू शेट्टी यांना हातकणंगलेची जागा पवार गटाच्या कोट्यातून मिळण्याची शक्यता बोलून दाखवली जात होती. पंजाब आणि पश्चिम बंगाल मध्ये आप आणि टीएमसी ने स्वबळाची भाषा केल्यानंतर आज तातडीने महाविकास आघाडीने मुंबई मध्ये बैठक बोलावली आहे.