Lok Sabha Elections Results 2019 ABP Majha LIVE NEWS STREAMING: लोकसभा निवडणूक निकाल 2019, इथे पहा लाईव्ह
या मतदानाची मतमोजणी आज देशात पार पडते आहे
लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) मतदान यंदा देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज (23 मे) दिवशी हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवातीला कल आणि हळूहळू कौल हाती येणार आहेत. निवडणूक मतदानानंतर जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलच्या(Exit Poll) अंदाजानुसार केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. मतदारांनी एनडीए च्या बाजूने मतदान केलं आहे. आता एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. यंदा एबीपी आणि नेल्सनने जाहीर केलेल्या एक्झिट पोल नुसार केंद्रात एनडीए 267, युपीए 127 आणि इतर 148 ला जागा मिळतील तर महाराष्ट्रात हा अंदाज आघाडीला 13 आणि युतीला 34 असा वर्तवण्यात आला आहे. एबीपी लोकसभा निवडणूक निकाल, लोकसभा निवडणूक निकाल 2019 आणि नेल्सनचे हे अंदाज खरे ठरतात का? हे पाहण्यासाठी पहा एबीपी माझाचं लाईव्ह इलेक्शन कव्हरेज.. लोकसभा निवडणुक 2019 चे Live निकाल कंप्युटर आणि मोबाईलवर 'या' पद्धतीने पाहा
देशामध्ये यंदा 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. या मतदानाची मतमोजणी आज देशात पार पडते आहे. एकूण 542 जागांसाठी पार पडलेल्या मतदानामध्ये यंदा कुणाच्या गळ्यात खासदारपदाची माळ पडते हे पाहण्यासाठी अजून काही तास वाट पहावी लागणार आहे.