Lok Sabha Elections 2024: कॉंग्रेसला 7 ठिकाणी पाठिंबा देणार्या वंचित च्या प्रकाश आंबेडकरां विरूद्धच कॉंग्रेसने दिली डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी
अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूकीच्या रिंगणात अनेक आघाड्या आणि युत्या बनताना, बिघडताना दिसत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) सोबत अखेरच्या टप्प्यात वंचित ची बोलणी फिस्कटली आणि त्यांनी एकला चलो चा नारा दिला आहे. पण वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कॉंग्रेसला महाराष्ट्रात 7 ठिकाणी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. पण अकोला मध्ये कॉंग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्धच उमेदवार जाहीर केला आहे. कॉंग्रेसने अकोल्यात डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावर अद्याप वंचित कडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अकोला मध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे. कॉंग्रेस कडून अभय पाटील, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसने उमेदवारी दिलेले अभय पाटील हे पेशाने डॉक्टर आहेत. अकोला मध्ये मागील 30 वर्षापासून अभय पाटील ऑर्थोपेडीक सर्जन म्हणून काम करत आहेत. त्यांनी अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांनी अकोला आणि वाशिम मध्ये मराठा क्रांती मोर्च्याचे आयोजन देखील केले आहे.
वंचित बहुजन आघाडीने आधी शिवसेना ठाकरे गटाशी हातमिळवणी केली होती. त्यांनीच वंचितला महाविकास आघाडी मध्ये आणण्याचे प्रयत्न केले पण जागावाटपाच्या तिढ्यात त्यांची बोलणी यशस्वी न झाल्याने वंचितने महाविकास आघाडीत सामील न होत केवळ कॉंग्रेसला 7 जागांवर बिनशर्त पाठिंबा दिला. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या एनसीपी कडून बैठकींचं आमंत्रण मिळाले नसल्याचे म्हटलं. तसेच संजय राऊत यांच्यावर जाहीर टीका केली. Lok Sabha Elections 2024: महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला 5 जागा देऊ केल्या; प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपावर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया.
दरम्यान प्रकाश आंबेडकर 4 एप्रिल दिवशी सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.