Lok Sabha Elections 2019 Phase 4 Voting: कांदिवली मध्ये मतदानासाठी दीड किमी लांब रांगेत उभे राहिले मतदार (Video)
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लांबच लांब रांगेत उभे राहून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे.
Lok Sabha Elections 2019: मुंबईमध्ये लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) साठी चौथ्या आणि अंतिम टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. या मतदानासाठी सकाळपासून सेलिब्रिटी,राजकारणी पासून सामान्य नागरिकांमध्ये मतदानाचा (voting) उत्साह दिसला आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील 17 मतदारसंघांमध्ये 31.74% मतदान पार पडले आहे. सध्या उन्हाचा पारा चढा असल्याने तसेच विकेंडला लागून मतदान आल्याने अनेकांनी लॉंग विकेंडचेही प्लॅन केले असतील पण कांदिवलीमध्ये (Kandivali) दृश्य थोडे वेगळे होते. Lok Sabha Elections 2019 Fourth Phase Voting Live Updates: अभिनेता सलमान खान, क्रिकेटर सचिन तेंडुलकरने वांद्रे येथे बजावला मतदानाचा हक्क
सुमारे दीड किमी लांब रांग
दुपारच्या वेळेसही मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथे एका मतदारकेंद्रावर मतदारांनी मोठी गर्दी केली होती. सध्या सोशल मीडियावर या लांबच लांब रांगेचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. Lok Sabha Elections 2019: ऑनलाईन आणि SMS च्या माध्यमातून तुमचं मतदान केंद्र कसं पहाल?
आज मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांग पहायला मिळाली. एनसीपीच्या जितेंद्र आव्हाडांनी देखील मतदानानंतर ट्विट करताना आपण तासभर रांगेत उभे राहिल्यानंतर मतदानाचा हक्क बजावला असं सांगितले आहे.