Lok Sabha Elections 2019: भाजप मधून पत्ता कट झाल्यानंतर स्मिता वाघ राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार?

लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव (Jalgaon) मतदार संघाकडून प्रथम स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी देण्यात आली होती.

स्मिता वाघ (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव (Jalgaon) मतदार संघाकडून प्रथम स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर स्मिता वाघ यांची उमेदावरी नाकारात भाजपने (BJP) उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता भाजप मधून पत्ता कट झाल्यानंतर स्मिता वाघ राष्ट्रवादी (NCP) पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, स्मिता वाघ आणि त्यांचे पती उदय वाघ यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांच्यामध्ये एक बैठक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच देवकर यांनी येत्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वाघ परिवाराने सहकार्य करावे अशी विनंती केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: जळगाव येथून स्मिता वाघ यांना डच्चू, उन्मेष पाटील यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी)

तर चाळीसगावचे खासदार उन्मेष पाटील हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते त्यावेळी स्मिता वाघ सुद्धा तेथे उपस्थित होत्या. तसेच मीडियासमोर स्मिता वाघ यांनी उन्मेष पाटील यांना पाठिंबा देत असल्याचा दिखावा केला. परंतु आता देवकर यांच्या भेटीनंतर आता स्मिता वाघ राष्ट्रवादीला पाठिंबा देणार का असे तर्कवितर्क लावले जात आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement