मनोहर पर्रिकर यांना राफेल कराराचा व्यवहार मान्य नसल्याने सोडले होते संरक्षण मंत्रीपद - शरद पवार
मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांना राफेल करारासाठी (Rafel Deal) सुरु असलेली प्रक्रियेची पूर्ण माहिती होती.
मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांना राफेल करारासाठी (Rafel Deal) सुरु असलेली प्रक्रियेची पूर्ण माहिती होती. परंतु कराराची प्रक्रिया मान्य नसल्याने पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रीपद सोडल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) कोल्हापूरातील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
सत्तेत असलेल्या मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा जास्त प्रमाणात मतदान मिळण्यासाठी मोदींकडून प्रयत्न केले जात असून त्याचसोबत पुन्हा एकदा लोकांची दिशाभूल केली जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सभेत प्रथम मतदान शहीद जवानांसाठी करा असे म्हणाले होते यावरुन सुद्धा पवार यांनी टीका केली असून सैन्याचा राजकीय फायदा घेणे थांबवा असे म्हटले आहे.(हेही वाचा-मुंबईमध्ये 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 9 उमेदवारांनी मागे घेतले अर्ज; या आहेत प्रमुख लढती)
तर दुसऱ्या बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे. राज ठाकरे यांनी मोदी-शाह यांच्याविरुद्धची आक्रमक भुमिका योग्य असून ती प्रभावीपमे मांडत आहेत. तसेच भाषणांमधून उदाहरणे देऊन मोदी सरकारवर राज ठाकरे टीका करत आहेत. मात्र राज ठाकरे आणि मी निवडणुक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. परंतु राज्य चुकीच्या लोकांच्या हातातून काढून घेण्यासाठी सर्वांची मदत घेणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच भाजप-सेना यांचे सरकार नको असल्याची मनोधारणा जनतेची असल्याचे ही शरद पवार यांनी म्हटले आहे.