पुणे: मतदान करा अन् हॉटेलात सवलत मिळवा
पुणे, बारामती, माढा, जळगाव यांच्यासह राज्यातील 14 मतदारसंघात आज मतदान होणार आहे.
Loksabha Elections 2019 Phase III: आज राज्यात लोकसभा निवडणूक 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. पुणे, बारामती, माढा, जळगाव यांच्यासह राज्यातील 14 मतदारसंघात आज मतदान होणार आहे. लोकशाहीच्या या उत्सावानिमित्त पुण्यातील अनेक हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थांवर सवलती देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मतदान केल्यानंतर बोटाला लावण्यात येणारी शाई दाखवून तुम्ही बिलावर चक्क 10-25% पर्यंत सूट मिळवू शकता. (दिल्ली: मतदान करणाऱ्यांना मिळणार औषधोपचारात 10-15% सूट; 'या' रेस्टोरन्टमध्ये घ्या मोफत जेवणाचा आस्वाद)
पुण्यातील हॉटेल्स आणि तिथे मिळणाऱ्या सवलती:
# मयूर कॉलनीतील कडक मिसळ- एकावर एक फ्री.
# घरगुती उत्पादनांसाठी प्रसिद्ध अग्रज फूड्स- 10% सवलत.
# 'द ग्रीन लिफ' हॉटेल- बिलावर 15% सूट
# 'स्पाइस मंत्रा' हॉटेल- 25% सूट
# तसंच बिबवेवाडी परिसरातील हॉटेल- पोहे आणि उपमा यावर विशेष सवलत. अर्ध्या किंमतीत दोन्ही पदार्थांचा आस्वाद घेता येईल.
मतदानाला प्रोत्साहन देण्यासोबतच व्यावसायिक फायदा देखील या ऑफर्समधून साधला जात आहे. या सर्व ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मतदान करणे आणि त्याचा पुरावा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.