'कोणाच्या तालावर नाचणारे 'भक्त' बनू नका'; व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंतप्रधान मोदी, भाजपवर हल्ला

तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि विरोधकांनी 'चौकीदार चौर है' असे म्हणत पंतप्रधान मोदींच्या मै भी चौकीदार कँम्पेनची खिल्ली उडवली आहे.

Main Bhi Chowkidar | (Photo Credit : Twitter/NCPspeaks)

Lok Sabha Elections 2019: 'कोणाच्या तालावर नाचणारे 'भक्त' बनू नका, 'सशक्त' भारत बनविण्यासाठी योग्य उमेदवारालाच मतदान करा!', असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi), भाजप (BJP) आणि त्यांच्या 'मैं भी चौकीदार' (Main Bhi Chowkidar) कँम्पेनची खिल्ली उडवली आहे.

भाजप कार्यालयाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी साधर्म्य दाखवणारी एक व्यक्तीरेखा पुंगी वाजवताना दिसते आहे. या पुंगीतून 'अच्छे दिन', 'रोजगार', '15 लाख' आणि 'मैं भी चौकीदार' असे स्वर उमटताना दिसत आहे. तर, पुंगीतील सुरांच्या तालावर भगवे वस्त्रधारी एक भक्त नाचताना दिसत आहे. या 'भक्ताच्या तोंडी मैं भी चौकीदार' असे वक्तव्य दिसत आहे. मागे भाजप कार्यालयाचा दरवाजा दिसत असून त्यावर कमळाचे चित्र आणि त्याखाली भाजप कार्यालय अशी अक्षरे दिसत आहेत. (हेही वाचा, महाराष्ट्रात 28 ते 30 जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकून येतील: जयंत पाटील)

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 साठी एकूण 7 टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. त्यापैकी दोन टप्प्यांचे मतदान या आधी पार पडले आहे. तर, आज (23 एप्रिल 2019) तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. निवडणूक प्रचारात भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मै भी चौकीदार हे कॅम्पेन राबवत प्रचार सुरु केला आहे. तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि विरोधकांनी 'चौकीदार चौर है' असे म्हणत पंतप्रधान मोदींच्या मै भी चौकीदार कँम्पेनची खिल्ली उडवली आहे.