लोकसभा निवडणूक 2019: 56 मार्क्सची प्रश्नपत्रिका लॉन्च करत भाजपवर मनसे 'पेपर स्ट्राईक'
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत शेलार यांनी राज ठाकरे यांच्याप्रमाणेच व्हिडिओ क्लिप्स दाखवत मनेसेने उपस्थित केलेल्या प्रश्नांचा प्रतिवाद केला. यावर मनसेने आता 56 गुणांची एक प्रश्नपत्रिका लॉन्च केली आहे.
LOk Sabha Elections 2019: 'लाव रे तो व्हडीओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि भाजप (BJP) सरकार कारभाराची पोलखोल करणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या वेळी मनसेने एखादा व्हिडिओ नव्हे तर, चक्क ५६ गुणांची प्रश्नपत्रिका प्रसिद्ध केली आहे. भाजपच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी मनसे प्रश्नपत्रिका (MNS Question Paper) सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यामुळे या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत भाजप (BJP) मनसे (MNS)परीक्षेत पास होणार का याबाबत उत्सुकता आहे.
राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत प्रतिवाद केला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत शेलार यांनी राज ठाकरे यांच्याप्रमाणेच व्हिडिओ क्लिप्स दाखवत मनेसेने उपस्थित केलेल्या प्रश्नांचा प्रतिवाद केला. यावर मनसेने आता 56 गुणांची एक प्रश्नपत्रिका लॉन्च केली आहे. या मध्ये विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची भाजप कसे उत्तरे देते याबबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ' विरुद्ध भाजपचे 'बघाच तो व्हिडिओ')
मनसे अधिकृत फेसबुक पेज पोस्ट
दरम्यान, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे हे पाकिस्तानमधील कोणत्या नेत्याला वाटते, महाराष्ट्रातील कोणता नेता शेतकऱ्यांना 'साले' म्हणतो, जवानांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त वक्तव्य कोणत्या भाजप आमदाराने केले, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कधी होणार, आजवर पंतप्रधानांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या, पंतप्रधान किती देश फिरले, त्यातून काय साध्य झाले, राफेल करारावर पंतप्रधान जाहीरपणे स्पष्टीकरण का देत नाही, असे खोचक प्रश्न या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून विचारण्यात आले आहेत.