Lok Sabha Elections: राज ठाकरे यांना मुंबई मध्ये सभा घेण्यास परवानगी; 23 एप्रिलला काळाचौकी मधून धडाडणार तोफ

मुंबईच्या काळाचौकीमध्ये (Kalachowki) येत्या 23 एप्रिलला राज ठाकरेंच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे.

राज ठाकरे, मनसे अध्यक्ष (file photo)

LS Polls 2019 Campaigns Raj Thackeray Mumbai Rally:  नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे आणि महाड नंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ़ मुंबईत (Mumbai) धडाडणार आहे. लोकसभा निवडणूक 2019(Lok Sabha Elections) च्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ‘मोदी शहा मुक्त भारत’ करण्याची भूमिका घेत भाजपाविरोधी प्रचार करत महाराष्ट्रभर सभा घेतल्या. आता मुंबईच्या काळाचौकीमध्ये (Kalachowki) येत्या 23 एप्रिलला राज ठाकरेंच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे.

राज ठाकरेंना 24 ऐवजी 23 एप्रिलला सभा घेण्याची परवानगी

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारामध्ये उमेदवारांना 'एक खिडकी योजनें'तर्गत अर्ज करून परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार मनसेचा अर्ज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला होता. सुरूवातीला मनसे लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात नसल्याने परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र आज 24 ऐवजी 23  तारखेला मुंबईत राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. ‘कोणीतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे, काय होतास तू काय झालास तू!' भाजपा महाराष्ट्र ट्विटर अकाऊंटवरुन राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

काळाचौकी परिसरातील शहीद भगतसिंग मैदानावर राज ठाकरे 23 एप्रिल दिवशी संध्याकाळी सभा घेणार आहेत.  सध्या राज ठाकरे त्यांच्या सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि त्यांच्या सरकारच्या आश्वासनांची पोलखोल करत आहेत. राज ठाकरेंचं ‘लाव रे तो व्हिडिओ' वाक्य नेटकऱ्यांच्या हिटलिस्टवर, पहा व्हायरल मिम्स

महाराष्ट्रात चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान 29 एप्रिल दिवशी आहे. तर लोकसभा निवडणूक 2019 ची मतमोजणी 23 मे दिवशी आहे.