Lok Sabha Elections 2019: पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज थंडावणार; महाराष्ट्रासह 91 मतदानसंघात होणार 11 एप्रिलला मतदान

11 एप्रिलला मतदान होईल तर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Lok Sabha Elections (Photo Credit: File Photo)

Lok Sabha Elections 2019 First Phase Poll Date: लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदानाचा पहिला टप्पा 11एप्रिल 2019 दिवशी आहे. त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहे. देशात सात तर महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यामध्ये 17 व्या लोकसभेसाठी सार्वत्रिक मतदान मतदान होईल. याचा पहिला टप्पा 11 एप्रिल आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ - वाशिम या सात मतदारसंघांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रासह अन्य 20 राज्यांमध्ये एकूण 91 मतदानसंघातील प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे.  मतदार यादीमधील तुमचे नाव 'या' पद्धतीने शोधा

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी चोख व्यवस्था

चुरसीची लढत

पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये नागपूरात नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले आणि यवतमाळ वाशिममध्ये भवाना गवळी विरूद्ध माणिकराव ठाकरे यांच्यामधील लढत चुरशीची होणार आहे.  (नक्की वाचा: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मतदान पहिला टप्पा तारीख, मतदारसंघ आणि उमेदवार यादी)माध्यमांशी बोलताना नितीन गडकरी यांनी किमान 5 लाख माताधिक्क्याने जिंकून येऊ असा विश्वास बोलून दाखवला आहे. आज संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावेल. 11 एप्रिलला मतदान होईल तर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.