Lok Sabha Elections 2019: गोदिंया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी लोकांना पैशांचे वाटप
गोंदिया (Gondia) येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
Lok Sabha Elections 2019: गोंदिया (Gondia) येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लोकांची प्रचंड गर्दी सभेसाठी दिसून आली. परंतु ही गर्दी पैसे देऊन जमा केले असल्याचे सभेसाठी उपस्थित राहिलेल्या मंडळींनी सांगितले आहे. तसेच 100 ते 500 रुपये अशा प्रकारे लोकांना पैसे देऊन गर्दी वाढवण्यात आली होती.
तर लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार,मेरठ आणि वर्धा येथे यापूर्वी मोदी यांनी सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी गर्दी दिसून न आल्यामुळे आता गोंदिया येथील सभेत गर्दी वाढवण्यासाठी पैसे देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्याचसोबक भाजप पक्षाकडून व्हीआयपी पास सुद्धा वाटण्यात आले.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्रात विद्यमान 11 खासदारांना प्रमुख पक्षांकडून डच्चू; पक्षाने नाकारली उमेदवारी, पाहा यादी)
तसेच व्हीआयपी पाससह पैसे दिल्याचे सांगण्यात आले आहे. काही महिलांनीसुद्धा आम्हाला पैसे देऊन 150 रुपये दिल्याचे सांगितले आहे.तर यापूर्वी वर्धा येथील सभेसाठी सुद्धा व्हीआयपी पास छापण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्यावेळी 200 रुपये देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.