Lok Sabha Election 2024: 'महाराष्ट्रात 45 जागा जिंकू', महायुतीला विश्वास; 14 जानेवारीपासून जिल्हावार मेळावे सुरु

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते मंत्री दादा भुसे ( Dada Bhuse यांनी एक संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. या वेळी ही माहिती देण्यात आली.

Mahayuti Leader | (Photo credit: X)

महायुती (Mahayuti) आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) मोठ्या ताकदीने लढेन. त्यासाठी येत्या 14 जानेवारीपासून महायुतीच्या जिल्हावार मेळाव्यांना सुरुवात होईल. हे मेळावे साधारण फेब्रुवारी महिन्यात संपतील. त्यानंतर तालुकावर आणि बुथनिहाय मेळावे पार पडतील, अशी माहिती महायुतीद्वारे देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते मंत्री दादा भुसे ( Dada Bhuse यांनी एक संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. या वेळी ही माहिती देण्यात आली.

'लोकसभा निवडणुकीत महायुती 45 जागा सहज जिंकेल'

आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती कमीत कमी 45 जागा सहज जिंकेल असा विश्वास चंद्रशेखर बावनुकळे यांनी व्यक्त केला. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा महायुतीची शक्ती आणखी वाढेल. त्यासोबत अनेक पक्षप्रवेशही पार पडतील. त्या उलट समोरच्या बाजूला म्हणजेच विरोधकांमध्ये स्टेजवर केवल नेते दिसतील. त्यांच्या समोर कोणीच दिसणार नाही, असा अधिकचा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, Supriya Sule on LS Seat Sharing Formula: महाविकास आघाडीत लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; 8-10 दिवसात होईल जाहीर)

'महायुती आपल्या मित्रपक्षांसह ताकतीने लढेल'

सुनील तटकरे यांनी सांगितले की, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महायुती आपल्या मित्रपक्षांसह मोठ्या ताकतीने लढतील. आम्ही सर्वजण एकजुटीने लढू. आगामी काळात लवकरच नव्याने पक्षप्रवेश पार पडतील. ज्यामुळ महायुतीची ताकत आणखी मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, Supriya Sule Reaction on Devendra Fadnavis: “फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारी वाढली”, सुप्रिया सुळे गंभीर आरोप)

महाविकासआघडीही सक्रीय

दरम्यान, महायुती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या स्थापन झालेल्या 'इंडिया' आघाडीचा घटक असलेली महाविकासआघडीही कामाला लागली आहे. महाविकासआघाडीतील नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या असून जागावाटपावर बोलणी सुरु आहेत. महायुती असो किंवा महाविकासआघाडी दोन्ही बाजूंकडून अद्यापतरी जागावाटप निश्चित झाले नाही. तसेच, कोणत्याही प्रकारे उमेदवारही जाहीर झाले नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांची तयारी जोमदार केली जात आहे. मात्र, प्रत्यक्ष अद्याप कोणताही निर्णय मात्र जाहीर होत नाही.

व्हिडिओ

पाठिमागील 10 वर्षे सलग सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप प्रणीत एनडीए आघाडीला सत्ता कायम राखण्याचे आव्हान आहे. तर, सलग दहा वर्षे सत्तेतून बाहेर असलेल्या विरोधकांना म्हणजेच इंडिया आघाडीला राष्ट्रीय पातळीवर सत्तेत परतण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीला सामोरे जाण्यास अवघे काहीच महिने बाकी आहेत. त्यामुळे अवघा देश इलेक्शन मोडवर जाण्यासाठी राजकीय पक्षांकडून पार्श्वभूमी तयार केली जात आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now