Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभेतून खासदार श्रीनिवास पाटील यांची माघार, प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय

तब्येत ठीक नसल्याच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे.

Photo Credit - Facebook

Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha Constituency) भाजपने उदयानराजेंना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झा ला आहे. विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil) यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेतली आहे. प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याची माहिती मिळत आहे. (हेही वाचा : Lok Sabha Election 2024 : मराठा समाजाच्या बैठकीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण; उमेदवारांकडून पैसै घेतल्याचा आरोप )

तब्येत ठीक नसल्यानं मी निवडणूक लढवत नाही, असं श्रीनिवास पाटील यांनी शरद पवारांना कळवलं आहे. शरद पवार आज सातारा (Satara) दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतीच माध्यमांत प्रतिक्रीया दिली. येत्या २-३ दिवसांत उमेदवार जाहीर करू असे त्यांनी म्हटले आहे. उमेदवार कोण असावा? याबाबत ते विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकीत निर्णय होईल.

श्रीनिवास पाटील यांच्यानंर उमेदवारीसाठी सारंग पाटील (Sarang Shriniwas Patil), बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. एकीकडे श्रीनिवास पाटील यांचा सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी असा देखील प्रस्ताव आहे. तर दुसरीकडे, कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी इथून उभं राहावं अशी मागणी केली आहे.