Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 54,09 टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामतीत सर्वात कमी
तिसऱ्या टप्प्यात राज्यात 54,09 टक्के मतदान झाले. यातच कोल्हापुरात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झाले. तर बारामतीत सर्वात कमी 47.84 टक्के मतदान झाले आहे.
देशभरात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज पार पडले. काही तुरळक घटना सोडल्यास देशभरात मतदान शांतपणे पार पडले. आज देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील 11 लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. तिसऱ्या टप्प्यात राज्यात 54,09 टक्के मतदान झाले. यातच कोल्हापुरात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झाले. तर बारामतीत सर्वात कमी 47.84 टक्के मतदान झाले आहे. ( हेही वाचा - Pune PDCC Bank: PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल)
तर देशात आसामामध्ये सर्वाधिक 75.26 टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच 54.77 टक्के मतदानाची नोंद झाली. तसेच बिहारमध्ये 56.55 टक्के, छत्तीसगडमध्ये 66.99 टक्के, दादरा नगरहवेलीमध्ये 65.23 टक्के आणि गोव्यात 74.27 टक्के मतदान झाले.
पाहा पोस्ट -
राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?
लातूर – 55.38 टक्के
सांगली – 52.56 टक्के
बारामती – 47.84 टक्के
हातकणंगले – 62.18 टक्के
कोल्हापूर – 63.71 टक्के
माढा – 50.00 टक्के
धाराशिव – 56.84 टक्के
रायगड – 50.31 टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- 53.75 टक्के
सातारा – 54.74 टक्के
सोलापूर – 49.17 टक्के
राज्यात पवार वि. पवार अश्या सामन्याने रंगलेल्या बारमती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. पंरतू यानंतरही बारामतीमध्ये सर्वात कमी मतदान झालेले पहायला मिळाले. या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या मुख्य उमेदवार होत्या.