Lok Sabha Elections 2019: सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केला राजकीय संन्यास; भविष्यात निवडणूक लढणार नाही, यंदा लोकसभेत विजयी करा
जयसिध्देश्वर महास्वामी यांचे आव्हान आहे.
Solapur Lok Sabha Constituency: कॉंग्रेस पक्षाचे सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी यंदा लढत असलेली लोकसभा निवडणूक ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केलं आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. आज महाराष्ट्रात होणार्या लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Election) च्या दुसर्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता.
सोलापूरमधील मतदारांना भावनिक आवाहन करताना आज सुशील कुमार शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणूक आपल्या राजकीय कारकीर्तील शेवटची निवडणूक असल्याने मला विजयी करा असे आवाहन केले आहे. सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांचे आव्हान आहे. भाजप पक्ष आगामी लोकसभा जिंकल्यास ती देशाची अंतिम निवडणुक ठरेल - सुशीलकुमार शिंदे
काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली झाल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या. सोलापूरमधल्या बालाजी सरोवर हॉटेल इथं प्रकाश आंबेडकर थांबले होते. या दरम्यान आंबेडकर थांबलेल्या हॉटेलवरच काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर ही थांबले होते. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या सुशील कुमार शिंदेंची आणि आंबेडकरांची योगायोगाने भेट झाली असे सांगण्यात आले आहे. Lok Sabha Elections 2019: सुशील कुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर आणि डॉ. जयसिद्धेवर स्वामी यांच्यामध्ये रंगणार सोलापूर लोकसभा मतदारसंघात लढत; उमेदवारीचा अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन
सोलापूरमध्ये महाराष्ट्रात दुसर्या टप्प्यात होणार्या 10 मतदार संघामध्ये समावेश आहे. 18 एप्रिल दिवशी हे मतदान पार पडे. या दिवशी बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड उस्मानाबाद लातूर, सोलापूर लोकसभा मतदार संघात मतदान आहे. तर 23 मे दिवशी मतमोजणी पार पडणार आहे.