Lockdown: लॉकडाऊन हटविण्यात आला नाही, रुतलेल्या अर्थचक्राला बाहेर काढण्यासाठी नवी सुरुवात: उद्धव ठाकरे
अजिबात हटविण्यात आला नाही. केवळ राज्याचे आर्थिक चक्र रुतले आहे. ते बाहेर काढण्यासाठी एक चाचणी म्हणून काही प्रमाणात शिथील करण्यात येत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
लॉकडाऊन (Lockdown) हटविण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी अजिबात गर्दी करु नये. नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे, असे अवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे. सोशल डिस्टन्सींग योग्य पद्धतीने पाळले नाही तर पुन्हा एकदा नवी बंधणे घालावी लागतील. काही ठिकाणी लोक लॉकडाऊन हटल्याप्रमाणे घराबाहेर पडत आहेत. पण असे चालणार नाही. लॉकडाऊन हटविण्यात आला नाही. अजिबात हटविण्यात आला नाही. केवळ राज्याचे आर्थिक चक्र रुतले आहे. ते बाहेर काढण्यासाठी एक चाचणी म्हणून काही प्रमाणात शिथील करण्यात येत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आजच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. या आधी उद्धव ठाकरे यांनी कालही (19 एप्रिल 2020) फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधला होता. या वेळी त्यांनी नागरिकांच्या संयमाला दाद देत पुन्हा एकदा आणखी काही दिवस संयम बाळगण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. ही वेळ आपल्या जीवन मरणाशी संबंधित आहे. जर जिवंत राहायचे असेल तर, घरात बसणेच योग्य. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर अडचण झाली आहे. त्याबाबत क्षमा मागत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्याबाबतही संकेत दिले होते.
दरम्यान, केंद्र सरकार, राज्यातील विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिक कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत चांगले सहकार्य करत आहेत. या लढाईत सर्वच जण उतरले आहेत. त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले होते.