Lockdown: LUDO खेळाचे उदाहरण देत ठाणे पोलिसांचा हटके संदेश, 'जी सोंगटी घरात राहील ती सुरक्षित राहील'

मग कोरोना व्हायरस संकट, लॉकडाऊन आदी गोष्टी असो अथवा वाहतुकीचे नियम. पुणे पोलीस आपल्या खास पुणेरी अंदाजातच पुणेकरांना समजवतात.

(Photo Credits: Twitter/ Pune Police )

कोरोना व्हायरस आणि (Lockdown) काळात  घरी राहण्यासाठी ठाणे पोलिसांनी एक हटके संदेश दिला आहे. त्यासाठी ठाणे पोलिसांनी खास LUDO खेळाचे उदाहरण दिले आहे. या उदाहरणाच्या माध्यमातून कोरोना व्हायरस ( Coronavirus) गांभीर्य आणि लॉकडाऊन (Lockdown) काळात घरी राहण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे पोलिसांनी . LUDO खेळाचा आधार घेत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'LUDO या गेम मधून एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळते, जी सोंगटी घरात राहील ती सुरक्षित राहील'. ठाणे पोलीस (Pune Police) नेहमीच आपल्या प्रतिभासंपन्न संकल्पनेच्या माध्यमातून ठाणेकरांना संदेश देत असतात. या आधिही ठाणे पोलिसांनी अनेकदा असा प्रयत्न केला आहे.

या आधीही ठाणे पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून कोरोना व्हायरस बाबत जनजागृती केली आहे. त्यासाठी टीव्ही कार्टून, व्यंगचिंत्र म्हणी, वाक्यप्रचार अशा विविध पद्धतीचा आधार घेतला आहे. आताही पुणे पोलिसांनी LUDO या खेळाचा आधार घेत संदेश दिला आहे. ठाणे पोलिसांनी म्हटले आहे की, 'LUDO या गेम मधून एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळते, जी सोंगटी घरात राहील ती सुरक्षित राहील'. (हेही वाचा, Bandra Incident: मुंबई येथील वांद्रे रेल्वे स्टेशन गर्दी प्रकरणी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर गुन्हा दाखल )

ट्विट

दरम्यान, जगभरातील कोरोना व्हायरस रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण पाहता महाराष्ट्रात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जगभरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात महाराष्ट्रातील मृत्यूदर (Mortality Rate) अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. कोणत्याही स्थिती गर्दी टाळण्यावर सरकार आणि पोलिसांचा अधिक भर आहे.