Coronavirus: महाराष्ट्र पोलिसांकडून सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या 'टन' भर शुभेच्छा!; नागरिकांना म्हटले 'स्ट्रेट घरी ड्राईव्ह करा '

महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) म्हणतात 'विनाकारण बाहेर फिरत असाल तर स्ट्रेट घरी ड्राईव्ह करा. ही 'टेस्ट' भारतच जिंकणार!'

Sachin Tendulkar Birthday | (Photo Credits: Maharashtra Police)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्र पोलिसांनी सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिमित्त 'टन'भर शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी तेंडुलकर यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना राज्यातील नागरिकांनाही खास संदेश दिला आहे. कोरोना व्हायरस संकटाचा सामना करताना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन न करता घरीच थांबा असे अवाहन पोलिसांनी केले आहे. महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) म्हणतात 'विनाकारण बाहेर फिरत असाल तर स्ट्रेट घरी ड्राईव्ह करा.

ही 'टेस्ट' भारतच जिंकणार!'

महाराष्ट्र पोलिसांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?

महाराष्ट्र पोलिसांनी सचिन तेंडूलकर यांचा एक फोटो शेअर करत ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''सचिनच्या 'स्ट्रेट ड्राईव्ह' ने अनेकदा भारताला जिंकवलंय! आता तुमची पाळी आहे. विनाकारण बाहेर फिरत असाल तर स्ट्रेट घरी ड्राईव्ह करा. ही 'टेस्ट' भारतच जिंकणार! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ला वाढदिवसाच्या 'टन' भर शुभेच्छा!'' अशी पोस्ट करत पोलिसांनी #Sachinbirthday असा हॅशटॅगही वापरला आहे. (हेही वाचा, Happy Birthday Sachin Tendulkar: 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर याचे 'हे' 5 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड फलंदाजांना करावा लागणार कठोर परिश्रम)

महाराष्ट्र पोलीस ट्विट

दरम्यान, नागरिकांनी लॉकडाऊन नियमांचे पालन करावे. घरात राहावे. छोट्या छोट्या कारणांसाठी घराबाहेर पडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. कधी कधी नियामांचे पालन कराना नागरिक आणि पोलिस यांच्यात संघर्षही पाहायला मिळत आहेत. परंतू, हे सर्व आपल्याच सेवेसाठी आहे हे नागरिकांना पटवून देण्यात पोलीस यशस्वी होत आहेत. समजदार जनताही पोलिसांना सहकार्य करत आहे. दरम्यान, नागरिकांनी नियमांचे पालन करुन कोरोना व्हायरसशी लढा दिल्यास कोरोना विरुद्धची लढाई लवकर जिंकली जाईल, असा विश्वास पोलीस आणि सरकार व्यक्त करत आहे.