Lockdown In Maharashtra: राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नागरिकांना जर तुम्हाला लॉकडाऊन नको असेल तर नियमांचे पालन करा असे म्हटले आहे अशातच आता ठाकरे सरकारमधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लॉकडाऊन संबंधित मोठे विधान केले आहे.

Coronavirus Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

Lockdown In Maharashtra: राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नागरिकांना जर तुम्हाला लॉकडाऊन नको असेल तर नियमांचे पालन करा असे म्हटले आहे अशातच आता ठाकरे सरकारमधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लॉकडाऊन संबंधित मोठे विधान केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. त्यावेळी ते इंदापूर येथे बोलत होते असे TV9 मराठी यांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. (Aurangabad: औरंगाबादच्या कोव्हिड सेंटरमध्ये घडला धक्कादायक प्रकार; कोरोनाबाधित रुग्ण चक्क गेट उघडून पडले बाहेर, पाहा व्हिडिओ)

मुंबईसह पुणे, औरंगाबाद,परभणीसह विदर्भातील विविध जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे काही ठिकाणी संचारबंदी सुद्धा स्थानिक प्रशासनाकडून लागू करण्यात आली आहे. तर भारणे यांनी इंदापूर शहरातील आंबेडकरनगर भागात अधिक रुग्ण आढळून येत असल्याने घरोघरी जाऊ सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसोबत कोरोना संदर्भातील योग्य त्या उपयायोजना करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.(Lockdown in Amravati: अमरावती जिल्ह्यातील लॉकडाऊन 8 मार्चपर्यंत वाढवला)

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कोरोना व्हायरसच्या  वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन  नाईट कर्फ्यू यांसारखे कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईतही लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात आहे. यावर बोलताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख  यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केल आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्यास लॉकडाऊन होऊ शकतो, असे शेख म्हणाले.



संबंधित बातम्या

Maratha Reservation: मनोज जरांगे 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार; आरक्षण ओबीसी कोट्यातूनच देण्याची मागणी

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

Maharashtra Cabinet Expansion: ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं...'; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने Chhagan Bhujbal यांचे राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण