Lockdown In Amravati: अमरावती येथे येत्या 9-15 मे पर्यंत लॉकडाउन जाहीर, अत्यावश्यक सेवा 'या' वेळेत मिळणार घरपोच

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे.त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात येत्या 15 मे पर्यंत लॉकडाउनचे कठोर निर्बंध लागू केले आहेत.

Lockdown | (Photo Credit: Twitter)

Lockdown In Amravati:  राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे.त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात येत्या 15 मे पर्यंत लॉकडाउनचे कठोर निर्बंध लागू केले आहेत. अशातच काही राज्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाउनचे आदेश जाहीर केले आहेत. तर अमरावती येथे येत्या 9-15 मे पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन घोषित केला आहे. परंतु या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. पण नागरिकांना त्या सुद्धा ठरवलेल्या वेळेत घरपोच दिल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अन्य गोष्टी पूर्णपणे बंद राहणार आहेत.(कोविड-19 लस आणि ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे मागणी)

जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउनचे आदेश जाहीर करत असे म्हटले आहे की, फक्त वैद्यकिय कारणाशिवाय नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नसणार आहे. तर घरातील किराणा, भाजीपाला, फळ विक्रेते, अंडी, दारुचे दुकाने किंवा बार बंद राहणार आहेत. पण किराणा आणि भाजीपाला हा नागरिकांना सकाळी 7 ते 11 च्या कालावधीत घरपोच नेऊन दिला जाणार आहे. अर्थातच काय, नागरिकांना प्रत्यक्षात मार्केटमध्ये जाऊन खरेदी करण्यास ही बंदी असणार आहे.

तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट, शिवभोजन थाळीची होम डिलिव्हरी सेवा सुद्धा नागरिकांसाठी सुरु असणार आहे. या व्यतिरिक्त कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी मंडई किंवा आठवडी बाजार ही बंद राहणार आहे. पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने णि पावसाळ्या संबंधित असणाऱ्या गोष्टींची दुकाने ही बंद ठेवली जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.(Lockdown in Solapur: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सोलापूरात 8 ते 15 मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही राहणार बंद)

अमरावती मध्ये लॉकडाउन करण्यासह धार्मिक सण, लग्नसमारंभासाठी कार्यलाये किंवा हॉल्स पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहेत. लग्न हे अवघ्या 15 जणांच्या उपस्थितीत फक्त 2 तासात उरकुन घेण्यास सांगितले आहे. मात्र लग्न समारंभ घरगुती पद्धतीने करण्याचे स्पष्ट केले आहे. अत्यावश्यक सेवासुविधांमधील वैद्यकिय दवाखाने, पशुचिकित्सक सेवा सुरु असणार आहे. तसेच मालवाहतूक, अॅम्बुलन्स, सरकारी वाहने, अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी आणि परवानगी पास असलेल्या नागरिकांनाच फक्त घराबाहेर पडता येणार आहे. त्याचसोबत बँका, पतसंस्था या सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे.