Lockdown: 'श्रमिक स्पेशल ट्रेन' नाशिक रेल्वे स्थानकातून भोपाळ, मध्य प्रदेशला रवाना
नाशिक रेल्व स्थानकातून निघालेल्या प्रवासी मजुरांमध्ये इगतपुरी येथील 152, नाशिक मनपा हद्दीतील 106 व नाशिक तहसील क्षेत्रातील 74 अशा एकूण 332 मजुरांचा समावेश आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी पाठविण्यासाठी 'श्रमिक स्पेशल ट्रेन' (Shramik Special Train) सुरु करण्यात आल्या आहेत. नाशिक रेल्वे स्थानक (Nashik Railway Station) येथून 'श्रमिक स्पेशल ट्रेन' आज (1 मे 2020) सायंकाळी भोपाळ, मध्य प्रदेशला रवाना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2020 पासून देशात लागू केलेल्या लॉकडाऊन (Lockdown) आज पुन्हा एकदा वाढविण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यामुळे नागरिकांची अगतिकतेतून सुटका करण्यासाठी आणि त्यांना मूळ गावी पोहोचविण्यासाठी नाशिक रेल्वे स्थानकातून 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सोडण्यात आली.
नाशिक जिल्ह्याच्या निवारा गृहांमध्ये ठेवण्यात आलेल्या मजूरांसाठी मुंबईवरुन खास ट्रेन भोपाळकडे रवाना करण्या आली. ही ट्रेन प्रामुख्याने मध्य प्रदेश राज्यातील सुमारे 332 मजूरांना घेऊन भोपाळकडे रवाना झाली. ही ट्रेन भोपाळला रवाना झाली तेव्हा जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवारा सेंटर व्यवस्थापन ) नितीनकुमार मुंडावरे आदी उपस्थित होते. (हेही वाचा, Lockdown: लॉकडाऊन काळात घरी जाण्यासाठी गृहमंत्रालयाची नियमावली; पाहा कसा करायचा अर्ज?)
एएनआय ट्विट
प्राप्त माहितीनुसार नाशिक रेल्व स्थानकातून निघालेल्या प्रवासी मजुरांमध्ये इगतपुरी येथील 152, नाशिक मनपा हद्दीतील 106 व नाशिक तहसील क्षेत्रातील 74 अशा एकूण 332 मजुरांचा समावेश आहे.
दरम्यान, देशभरातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकता ती सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या शेवटच्या अद्यवावत माहितीनुसार गेल्या 24 तासात देशभरात तब्बल 1755 नवे रुग्ण सापडले आहेत. तर, 77 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 35365 इतकी झाली आहे. यात उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आलेल्या 9064 जणांचाही समावेश आहे. तसेच देशभरातील कोरना संक्रमित एकूण 1152 मृतांचाही या आकडेवारीत समावेश आहे.