Lockdown: पुणे येथे संचारबंदीच्या काळात विक्रेत्याकडून नागरिकांची लूट; चढ्या भावाने अत्यावश्यक वस्तूंची विक्री

दरम्यान, अत्यावश्यक सेवा (Essential Materials) वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, संचारबंदीत विक्रेत्यांकडून ठिकठिकाणी नागरिकांची लूट होत असल्याचे समोर आले आहे.

Foodgrains (Photo Credits: File Photo)

कोरोना विषाणूचे वाढता प्रादुर्भाव पाहता देशात संचारबंदीची (Lockdown) घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा (Essential Materials) वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, संचारबंदीत विक्रेत्यांकडून ठिकठिकाणी नागरिकांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी घोषीत केलेल्या संचारबंदीचे अनेकजण गैरफायदा घेऊ लागले आहेत, अशा लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. पुणे (Pune) येथे नागरिकांची लूट करण्याऱ्या 5 विक्रेत्यांवर करण्यात आली आहे. या कारवाईत 3 किराणा दुकानदार, 1 मेडिकल, 1 गॅस एजन्सीचा समावेश आहे. हा गैरप्रकार करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखा सज्ज झाली आहे. पुण्यातील खडकी आणि टिळक रोडला हा गैरप्रकार अधिक प्रमाणात सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्येही चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या या महामारीच्या काळात दानशूर लोक मदतीसाठी पुढे येत असताना अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारे नागरिकांना लुटण्याचे काम अनेक ठिकाणी सुरु आहे. यावर प्रशासनाचे लक्ष असून अशा प्रकारे चढ्या भावाने विक्री करणाऱ्या आस्थापनांवर छापासत्र सुरु ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पुनाजी चौधरी नावाच्या किराणा दुकानदाराने नागरिकांना लुटण्याची सीमाच ओलांडून टाकली आहे. पुनाजीने शेंगदाणे 180 रुपये किलो, तूरडाळ 160 रुपये किलो, मूगदाळ 155 रुपये किलो, चणादाळ 140 रुपये किलो, खोबरे 280 रुपये किलो आणि शाबूदाणा 135 रुपये किलो तर, साखर 48 रुपये किलोने विकत होता. यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात अशाप्रकारे अनेक ठिकाणी नागरिकांची लूट केली जात आहे. संचारबंदीत अनेक ठिकाणी दुकाने बंद असल्यामुळे नागरिक नाईलाजाने चढ्या भावाने वस्तूंची खरेदी करू लागले आहेत, अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: बळीराजा तुझ्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा झाले का? पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना अंतर्गत केंद्र सरकार ट्रान्स्फर करतंय 5,125 कोटींचा निधी

कोरोना विषाणू हे भारतावर आलेले मोठे संकट आहे. या काळात प्रत्येक नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिक एक विचार करुन या संकटावर मात दिले पाहिजे. मात्र, या काळात काहीजण नागरिकांच्या मजबूरीचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे.