Lockdown: 527 ट्रेनने 7 लाख 38 हजार परप्रांतीय कामगार मूळ राज्यात परतले; पाहा मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, नागपूर शहरांतून किती सुटल्या विशेष श्रमिक ट्रेन
राज्य सरकारची संपूर्ण तयारी झाली असून केंद्र सरकारने जास्तीत जास्त ट्रेन द्याव्या अशी मागणी सरकारने केली आहे.
कोरोना व्हायरस संकटादरम्यान लॉकडाऊन (Lockdown) काळात अनेक परप्रांतीय कामगार महाराष्ट्रात अडकले. या कामगारांपैकी तब्बल 7 लाख 38 हजार परप्रांतीय कामगारांना 527 श्रमिक विशेष ट्रेन (Shramik Special train) द्वारा त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh ) यांनी दिली आहे. ही आकडेवारी 24 मे पर्यंतची आहे. परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी दररोज किमान 100 ट्रेनची आवश्यकता असल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.
कोरोना व्हायरस संकट नियंत्रणासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्याचा फटका बसल्याने अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे अनेक मजूर/कामगार यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. अऩेकांच्या हातचे काम गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील मजूर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी मागणी करु लागले. त्यात केंद्र आणि राज्य यांच्यात चर्चेतून दिलासादायक चित्र पुढे न आल्याने या मजूरांनी रस्त्याने पायी जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, राज्य सरकारने या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी केंद्राकडे मोठ्या प्रमाणात ट्रेनची मागणी केली होती.सुरूवातीला केंद्र सरकारने यास मंजुरी दिली नाही. परंतु राज्य सरकारने वारंवार केलेल्या मागणीमुळे ही मंजुरी मिळाली.
Lockdown: विविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन (24 मे 2020 पर्यंत) |
||
अ.न. | राज्याचे नाव | ट्रेनची संख्या |
1 | उत्तर प्रदेश | 281 |
2 | बिहार | 112 |
3 | मध्य प्रदेश | 32 |
4 | झारखंड | 27 |
5 | कर्नाटक | 5 |
6 | ओडिशा | 15 |
7 | पश्चिम बंगाल | 5 |
8 | छत्तिसगड | 5 |
एकूण | 8 | 527 |
दरम्यान, पुढे अधिक माहिती देताना गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की, राज्य सरकारला या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या स्वगृही पाठवण्यासाठी दररोज 100 ट्रेनची आवश्यकता आहे. राज्य सरकारची संपूर्ण तयारी झाली असून केंद्र सरकारने जास्तीत जास्त ट्रेन द्याव्या अशी मागणी सरकारने केली आहे. (हेही वाचा, Coronavirus Update: महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? जाणून घ्या कोरोनाबाधितांची मनपा आणि जिल्हानिहाय आकडेवारी)
Lockdown: विविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन (24 मे 2020 पर्यंत) |
||
अ.न. | राज्याचे नाव | ट्रेनची संख्या |
1 | उत्तर प्रदेश | 281 |
2 | बिहार | 112 |
3 | मध्य प्रदेश | 32 |
4 | झारखंड | 27 |
5 | कर्नाटक | 5 |
6 | ओडिशा | 15 |
7 | पश्चिम बंगाल | 5 |
8 | छत्तिसगड | 5 |
एकूण | 8 | 527 |
अनिल देशमुख ट्विट
दरम्यान, आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये 281 बिहारमध्ये 112, मध्यप्रदेशमध्ये 32, झारखंडमध्ये 27, कर्नाटक मध्ये 5, ओरिसामध्ये 15, पश्चिम बंगालमध्ये 5, छत्तीसगडमध्ये 5 यासह इतर राज्यांमध्ये एकूण 527 ट्रेन या सोडण्यात आलेले आहेत. राज्यातील सर्वच रेल्वे स्टेशन मधून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) मधून 76, लोकमान्य टिळक टर्मिनल 74, पनवेल 35, भिवंडी 10, बोरीवली 37, कल्याण 7, पनवेल35, ठाणे 21, बांद्रा टर्मिनल 41, पुणे 54, कोल्हापूर 23, सातारा 9, औरंगाबाद 11, नागपुर 14 यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.