Lockdown: सांगलीमध्ये करोनाचा रुग्ण आढळल्याने इस्लामपूर शहरात 100 टक्के लॉकडाउन जाहीर; केवळ अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

सध्या भारतातही कोरोना विषाणूचे जाळे वेगाने पसरत चालले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आल्याने राज्यातील जनतेत भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे

| (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगाला हादरून टाकले आहे. सध्या भारतातही कोरोना विषाणूचे जाळे वेगाने पसरत चालले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आल्याने राज्यातील जनतेत भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच सांगली (Sangli)  येथे कोरोनाचा रुग्ण आढळ्याने  इस्लामपूर (Islampur) नगर परिषदेने शहरात 100 टक्के लॉकडाऊन घोषीत करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 15, 16, आणि 17 तारखेला लॉकडाउन (Lockdown) जाहिर करण्यात आला आहे. या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. सांगलीमध्ये करोनाचा रुग्ण आढळल्याने पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढली आहे. रेठरे धरण येथे हा रुग्ण सापडला आहे. गावी 20 दिवस राहिल्यानंतर तो मुंबईत परतला होता. मुंबईत चाचणी केली असता त्याला करोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या सांगलीमधील 25 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. मिरजमधील करोना रुग्णालयात या सगळ्यांना दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पूर्वकाळजी म्हणून रेठरे धरण गाव सील करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Coronavirus Lockdown: लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील आंबा व्यवसायाला मोठा फटका

भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 9 हजार 156 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 308 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 856 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 2064 वर पोहचली आहे. यात 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 208 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.

३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम ; राज्यातील 'या ' ठिकाणांची रेड, ऑरेंज, ग्रीन विभागात होणार विभागणी : Watch Video

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.