Lock Down Extension: महाराष्ट्रातील लॉक डाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 5 वाजता साधणार नागरिकांंशी संवाद

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्राच्या सहित संपूर्ण देशातील लॉक डाऊन (Lockdown) हे 30 एप्रिल पर्यंत सुरु ठेवण्याचा मोठा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे.

Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रा सहित संपूर्ण देशातील लॉक डाऊन (Lockdown) हे 30 एप्रिल पर्यंत सुरु ठेवण्याचा मोठा निर्णय सरकारतर्फे घेण्यात येउ शकतो. याबाबत कोणत्याही क्षणी घोषणा केली जाउ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  हे आज संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार आहेत, यामध्ये याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. महाराष्ट्रातील काही भाग हे कोरोनाचे हॉटस्पॉट म्ह्णून जाहीर केले गेले आहेत, या भागात लॉक डाऊन कायम ठेवून ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण नाहीत अशा जिल्ह्यातील नियम शिथिल केले जाण्याची सुद्धा शक्यता आहे. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  हे रीतसर घोषणा करू शकतात, तसेच राज्यांना सुद्धा आपापल्या अख्तियारीतील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची परवानगी आहेत.  ओडिशाच्या पाठोपाठ पंजाबमध्येही 1 मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर; मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत सुद्धा याविषयी चर्चा केली होती, त्यावेळेस सुद्धा अनेक नेत्यांनी कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लॉक डाऊन कायम ठेवण्याचे सुचवले होते आज सुद्धा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मोदींना लॉक डाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम ठेवण्याचे सुचवले होते. या सूचनांनुसार आणि सध्याची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता हा निर्णय घेतला जाउ शकतो. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचे संकट अधिक तीव्र; 92 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांचा आकडा 1666 वर)

दरम्यान, सद्य घडीला देशभरात, कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी वाढतच आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 1035 नवे रुग्ण समोर आले असून भारतात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7447 वर पोहचली आहे. तर अन्य 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 6565 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, 643 जणांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आतापर्यंत कोरोनाने देशात 239 बळी घेतले आहेत.

कोरोनाचा सर्वात मोठा फटका हा महाराष्ट्राला बसल्याचे दिसून येत आहे, महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 92 नवे रुग्ण आढळले आहेत तर एकूण रुग्णांचा आकडा हा 1666 पार गेला आहे.