Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो रविवारी मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच पडा बाहेर, तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबईत मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विद्याविहार अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असेल.

Mega Block | (File Image)

मुंबईत रेल्वेच्या (Mumbai Railway) तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक हा घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडणार असाल आणि ट्रेनने प्रवास करणार असाल तर, नियोजन करुनच घराबाहेर पडा. रविवारी रेल्वेकडून तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार असून या दरम्यान तांत्रिक काम आणि दुरुस्तीसाठी हा मेगाब्लॉक हा घेण्यात येणार आहे. रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.  (हेही वाचा - Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना अलर्ट)

मुंबईत मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विद्याविहार अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत  सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबून   विद्याविहार स्टेशनवर योग्य डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.  घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत नेरुळ आणि किले दरम्यान बीएसयू लाईन आणि तुर्भे आणि नेरुळ दरम्यान ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गासह पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.