Local Body Election In Maharashtra: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना ब्रेक, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; बघा तुमचा जिल्हा आहे का?
राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) अनेक जिल्हा परिषद निवडणूक (Zilla Parishad Election 2022) आणि पंचायत समिती निवडणुकीस (Panchayat Samiti Election 2022) स्थगिती दिली आहे. राज्य शासनाने 'महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये' काही बदल (दुरुस्ती) केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) अनेक जिल्हा परिषद निवडणूक (Zilla Parishad Election 2022) आणि पंचायत समिती निवडणुकीस (Panchayat Samiti Election 2022) स्थगिती दिली आहे. राज्य शासनाने 'महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये' काही बदल (दुरुस्ती) केले आहेत. या बदलांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे. आयोगाने या बाबतचे आदेश आजच (5 ऑगस्ट) काढले आहेत. तत्पूर्वी राज्य सरकारने 'महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961'मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश 4 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच कालच प्रसिद्धकेले आहेत.
निवडणूक कार्यक्रमास स्थगिती मिळालेले जिल्हे
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली
राज्य निवडणूक आयोग प्रसिद्धी पत्रक
राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद ( Zilla Parishad )व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) आज (5 ऑगस्ट) स्थगित करण्यात आली. राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश ४ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला आहे. सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना; तसेच आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे.
ट्विट
राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात आली.
— Maharashtra SEC (@MaharashtraSEC) August 5, 2022
सध्या २५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज (५ ऑगस्ट) रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्याचबरोबर १३ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी ८ ऑगस्ट २०२२ रोजी; तर १२ जिल्हा परिषदा व त्यांच्यातर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी १० ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली असून, यथावकाश पुढील आदेश देण्यात येतील, असे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2022 07:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

