Mother Suicide for CBSE Education: सीबीएसई शिक्षणाआड येणाऱ्या गरीबिला कंटाळून आईची मुलीसह आत्महत्या; निलंगा येथील घटना
ही महिला आपल्या दोन्ही मुलांना सीबीएसई इंग्रजी शाळेत (CBSE School) शिक्षण (Education) देण्याचे स्वप्न बाळगून होती. मात्र, हे स्वप्न पूर्ण होत नसल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे समजते.
लातूर (Latur District) जिल्ह्यातील निलंगा (Nilanga Taluka) तालुक्यात असलेल्या माळेगाव (क.) येथे राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मुलीला छातीशी कवटाळून विहिरीत उडी घेतली आणि आयुष्याची अखेर (Suicide) केली आहे. ही महिला आपल्या दोन्ही मुलांना सीबीएसई इंग्रजी शाळेत (CBSE School) शिक्षण (Education) देण्याचे स्वप्न बाळगून होती. मात्र, हे स्वप्न पूर्ण होत नसल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे समजते. भाग्यश्री व्यंकट हालसे असे या महिलेचे नाव आहे. ती 26 वर्षाची होती. धक्कादायक म्हणजे महिलेने विहिरीत उडी घेण्यापूर्वी आपल्या पतीला व्हिडिओ कॉल केला आणि 'आपल्या दीदीचा चेहरा शेवटचा पाहून घ्या' असेही म्हटले. औराद शहाजानी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुलांच्या इंग्रजी शिक्षणासाठी पतीकडे तगादा
भाग्यश्री हालसे, ही महिला आपला पती व्यंकट हालसे आणि कुटुंबीयांसोबत माळेगाव (क.) येथे वास्तव्यास होती. या पती पत्नीस सार्थक आणि समिक्षा नावाची अनुक्रमे मुलगा, मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. या दाम्पत्यास दीड एकर जमीन आहे. मात्र, ती जमीन पतीचे आईवडील म्हणजे महिलेचे सासू-सासरे कसतात. या दाम्पत्याचे हातावरचे पोट होते. ते शेळ्या राखून गुजरान करत असत. अशा स्थितीत भाग्यश्री या आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत (CBSE School) शिक्षण (Education) देण्याचे स्वप्न बाळगून होत्या. त्यासाठी त्या आपल्या पतीकडे सातत्याने तगादा लावत. मात्र, पती व्यंकट सातत्याने तिची समजूत घालत असत. तसेच, कुटुंबाच्या उपजीविकेसाठी काहीतरी नवी मार्ग शोधू आणि आपले स्वप्न पूर्ण करु, असे आश्वासन देत असे. तसेच, नाजूक परिस्थितीतही हे दोघे आपल्या मुलांना आवश्यक शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असत. (हेही वाचा, Woman's Dead Body In Water Tanker: पुण्यात पाण्याच्या टॅंकर मध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्या की आत्महत्या चा तपास सुरू)
सीबीएसई शिक्षणास होत असलेल्या विलंबातून नैराश्य
दरम्यान, मुलांना इंग्रजी शाळेत (CBSE School) शिक्षण (Education) घेण्यासाठी पाठविण्यास पती विलंब करत असल्याचे पाहून सदर महिला नाराज होती. मंगळवारी सायंकाळी या महिलेन अतीव नैराश्य आल्याने ही महिला आपल्या मुलीला सोबत घेऊन गावाबाहेर गेली. तिने थेट केदार पाटील यांची विहीर गाठली आणि पतीला फोन केला. फोनवर तिने आपल्या दीदीचे तोंड शेवटचे पाहा असे म्हटले आणि तिने विहीरीत उडी घेतली. (हेही वाचा, Woman's Dead Body In Water Tanker: पुण्यात पाण्याच्या टॅंकर मध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्या की आत्महत्या चा तपास सुरू)
पाण्यात बुडून मायलेकींचा मृत्यू
विहिरीत उडी घेतलेल्या भाग्यश्री हिस पोहता येत नव्हते. त्यामुळे पाण्यात बुडून मायलेकींचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. तसेच, पोलिसांनाही माहिती दिली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघींचाही मृतदेह पाण्यातून विहिरीबाहेर काढला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर ते कुटुंबीयांकडे सूपूर्द करण्यात आले. त्यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे.