लातूर: कर्मचाऱ्याच्या नोकरी अहवालासाठी वैद्यकिय अधिकाऱ्याने लाच घेण्यसाठी मागितल्या दारुच्या बाटल्या, पोलिसांकडून अटक

मात्र ही लाच पैशांची नसून चक्क दारुच्या बाटल्यांची असल्याचे उघडकीस आले आहे.

Representative Image (Photo Credit: Wikimedia Commons)

लातूर (Latur) येथे एका वैद्यकिय अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या नोकरीबद्दलच्या अहवालासाठी लाच मागितली. मात्र ही लाच पैशांची नसून चक्क दारुच्या बाटल्यांची असल्याचे उघडकीस आले आहे. तर दारुच्या बाटल्या लाच म्हणून मिळाल्यानंतर अधिकाऱ्याने आपल्या मित्रमंडळींसोबत पार्टी करण्यात मग्न झाला. त्याचवेळी पोलिसांनी पार्टी करत असलेल्या ठिकाणी धाड टाकत त्याला रंगेहाथ पकडले आहे.

अधिकाऱ्याला लाच म्हणून दारुचा एक खंबा आणि बिअरच्या बॉटल्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी अधिकाऱ्यालासुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.(मद्यपींसाठी खुशखबर! सरकार राज्यात 'Dry Day' ची संख्या घटवणार)

तर ज्या कर्मचाऱ्याचा नोकरी अहवाल मागवण्यात आला होता. त्यामध्ये कर्मचाऱ्याला 2018-19 वर्षासाठी उत्तम काम केला नसल्याचा शेरा देण्यात आला होता. मात्र कामात उत्तम शेरा मिळावा म्हणून अधिकाऱ्यांकडे त्याची मागणी केली होती. परंतु अधिकाऱ्याने या बदल्यात चक्क दारुची लाच मागितली असल्याचा प्रकार घडला आहे.